शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना वेतनाची प्रतीक्षा; मानधन मिळाले नसल्याच्या तक्रारी

By निखिल म्हात्रे | Updated: May 13, 2024 17:19 IST

अलिबागमध्ये परिचारिकांना मानधन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे.

निखिल म्हात्रे, अलिबाग :अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य सेवाअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून बंधपत्रिक कंत्राटी परिचारिकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र, या     परिचारिकांना मानधन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. मागील वर्षभरापूर्वी तीन महिन्यांचे मानधन रखडले होते. आता नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असूनदेखील मार्चमधील त्यांचे मानधन त्यांना मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबाबत संबंधित यंत्रणेला विचारूनदेखील त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याचेदेखील बोलले जात आहे.

ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत परिचारिकांची करारावर भरती करण्यात आली आहे. अकरा महिन्यांच्या करारानुसार परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ५४ बंधपत्रित कंत्राटी परिचारिका कार्यरत आहेत. या परिचारिकांना दर महिन्याला वीस हजार रुपयांचे मानधन दिले जाते. कंत्राटी परिचारिका कायमस्वरूपी परिचारिकांच्या बरोबरीने काम करतात. शासनाच्या वेगवेगळ्या योजना रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचविण्याचे कामदेखील त्या करतात. लसीकरणाच्या अभियनाबरोबरच वेगवेगळ्ळ्या योजनांची जनजागृतीदेखील या परिचारिकांच्या माध्यमातून केली जाते. कायम सेवेत असलेल्या परिचारिकांच्या खाद्याला खांदा लावून बंधपत्रित परिचारिका काम करतात. रात्रीचा दिवस करून आरोग्य सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निधी शासनाकडून वेळेवर मिळत नसल्याचा त्रास या परिचारिकांना होत आहे.

बंधपत्रित कंत्राटी परिचारिकांना दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन दिले जाते. निधी आल्यावर तातडीने मानधन वेतनाच्या स्वरूपात त्यांच्या खात्यात जमा केले जाते. मार्च महिन्यातील रखडलेले मानधन देण्याचा प्रयत्न केला जाईल.- डॉ. शीतल जोशी, अतिरिक्त शल्यचिकित्सक.

टॅग्स :alibaugअलिबागhospitalहॉस्पिटल