शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

आरडीसीसी बँकेला सहकारमहर्षी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 03:04 IST

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘सहकारमहर्षी’ हा सर्वोच्च पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (आरडीसीसी)ला जाहीर झाला आहे.

- जयंत धुळप अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘सहकारमहर्षी’ हा सर्वोच्च पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (आरडीसीसी)ला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे पुरस्कार सुरू करण्यात आले असून, २०१२-१३ मध्ये आरडीसीसी बँकेला ‘सहकारनिष्ठ’, २०१३-१४ मध्ये ‘सहकारभूषण’ हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.‘सहकारमहर्षी’ हा सहकार क्षेत्रातील राज्यातील सर्वोच्च पुरस्कार असून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांमधून या पुरस्काराकरिता निवड केली जाते. यामध्ये राज्यातील गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या, डेअरी, मल्टीस्टेट सहकारी बँका, हातमाग, यंत्रमाग, पणन अशा विविध एकूण २ लाख ३८ हजार सहकारी संस्था असून, त्यात शिखर संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, बिगर कृषी पतसंस्था, पणन संस्था, शेतीमाल प्रक्रि या उपक्रम संस्था, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, नागरी पतसंस्था, नोकरदारांच्या संस्था, सहकारी दुग्ध संस्था या सर्वांमधून ‘सहकारमहर्षी’ हा पुरस्कार निवडला जात असून, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या सर्वच सहकारी संस्थांमधून प्रथम क्रमांक मिळविला आहे.१९९७ मध्ये आमदार जयंत पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची धुरा सांभाळल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने आजवर सहकारी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली असून, बँकेच्या ५८ शाखांच्या माध्यमातून मार्च २०१८अखेर ३२०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर २००८ मध्येच बँकेने संगणकीकरण पूर्ण करून जिल्ह्यातील आपल्या सर्व ग्राहकांना अत्याधुनिक सेवा द्यायला सुरु वात केली. बँकेने देशामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या साहाय्याने कर्जवाटप सुरू केले. स्वखर्चाने रायगड जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी संस्थांचे संगणकीकरण करणारी आरडीसीसी बँक ही पहिली जिल्हा सहकारी बँक ठरली आहे. ३१ मार्च २०१८ पूर्वीच जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी संस्थांचे संगणकीकरण पूर्ण केले असून, त्या संस्थांना बँकेच्या माध्यमातून हार्डवेअर उपलब्ध करून दिले आहे.नाबार्डकडून आरडीसीसी बँकेवर चित्रफितआरडीसीसी बँकेच्या कामगिरीची दखल घेऊन, नाबार्डच्या वतीने बँकेवर एक चित्रफित तयार करून ती देशभर प्रसारित करण्यात आली आहे.त्याचबरोबर देशातील प्रमुख बँकांचे अधिकारी, नाबार्ड, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया यामधील सर्वोच्च अधिकारी यांनी आरडीसीसी बँकेला भेट देऊन बँकेच्या कार्यप्रणालीचा गौरव केला आहे.बँकेने ग्रामीण भागात महिलांना संघटित करून स्थापन केलेल्या १७ हजारांहून जास्त बचतगटांच्या माध्यमातून दोन लाखांपेक्षा अधिक महिलांना बँकेने एकत्र करून त्यांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळवून दिला आहे.