शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

15 जुलैपर्यंत सीएसएमटी-उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची लगीनघाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 07:20 IST

उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे.

उरण : नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त काढण्यात रेल्वे प्रशासन मश्गूल झाले आहे. सीएसटी ते उरण रेल्वे मार्गावरून प्रवाशांना घेऊन पहिली रेल्वे धावणार आहे. मागील ५० वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या  या मार्गावरून पहिल्यांदाच धावणाऱ्या या प्रवासी गाडीचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १५ जुलैपर्यंत दहा दिवसात कधीही प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त साधण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे. १७८६ कोटी खर्चाचा २७ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग  उरणकरांसाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा   आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीपासूनच या रेल्वे मार्गाचे काम अगदी रखडत-रखडत सुरू झाले होते, मात्र त्यानंतर त्यातील त्रुटी, तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. दरम्यानच्या काळात या रेल्वे मार्गावरील खारकोपर स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे. त्यानंतर खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत रखडलेली कामे वेगाने सुरू केली आहेत. 

वेगाने प्रगतिपथावर असलेल्या कामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मागील तीन-चार वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील कामे पूर्णत्वास नेऊन या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या अनेक डेडलाइन्स जाहीर केल्या होत्या. फेब्रुवारी, मार्च, मे २०२३ महिन्याच्या अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून अनेक वेळा या मार्गावर ट्रायल रनही घेण्यात आली आहे, मात्र या खारकोपर ते उरण या दरम्यानच्या मार्गावरील अनेक कामे अपूर्ण आहेत.

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात होणार उद्घाटन?पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. २० जुलैपासून पुढील २३ दिवस लोकसभेचे पावसाळी संसदीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान विविध कार्यक्रमांसाठी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्यादरम्यानच १५ जुलैपर्यंत सीएसटी ते उरण रेल्वे मार्गावरून प्रवाशांना घेऊन पहिली रेल्वे  प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त साधण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे