शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
4
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
5
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
6
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
7
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
8
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
9
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
10
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
11
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
12
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
13
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
14
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
15
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
16
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
17
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
18
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
19
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
20
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत

रोहा रेल्वेफाटकाचा खांब मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:14 AM

सुदैवाने अनर्थ टळला; प्रवासी, वाहनचालक खोळंबले

रोहा : शहरात असलेल्या रेल्वेफाटकाचा खांब गुरुवारी अचानक मोडून खाली पडला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवासी व वाहनचालक चांगलेच खोळंबले. मोडून पडलेला खांब हलविण्यात आल्यानंतर या मार्गावरून रहदारी सुरू झाली. फाटकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी केली आहे.रोहा रेल्वे स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रोहा-नागोठणे या राज्यमार्गावर डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयाजवळच असलेले रेल्वे फाटक अचानक तुटून खाली पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रेल्वे प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला होता. वाहनचालकांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवत फाटकातील कामगाराला बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही तेथे काम करणारा कामगार बाहेर आला नाही. शेवटी रोहा स्टेशनवरून स्टेशन सहायक प्रबंधक व त्यांची टीम धावत पळत रेल्वे फाटकापर्यंत आली आणि हा मोडलेला अधांतरी लोखंडी आडवा खांब बाजूला केला, तेव्हा प्रवाशांची सुटका झाली. त्या दरम्यान एक जलद रेल्वे गाडी रुळावरून पास झाली. रेल्वे प्रशासनाने या रेल्वे फाटकाकडे वेळोवेळी लक्ष देणे व त्यांचे मेंटनन्स करणे गरजेचे आहे.मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने या रेल्वेफाटकाजवळ वाहनचालक व प्रवासी यांचा नेहमीच खोळंबा होत असतो. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीमुळे ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी फाटकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाºयांवर रेल्वेने कारवाई करावी, अशी मागणी सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी केली आहे.प्रत्येक सप्ताहामधील सोमवारी आॅनड्युटी स्टेशन मास्तर, गेटमॅन व सिग्नल विभाग या फाटकाची तपासणी करतात. यामध्ये काही दुरुस्त्या असल्यास त्या करून घेतल्या जातात.-आर.जे. मीना, रेल्वे स्टेशन प्रबंधक, रोहारेल्वेफाटकाला वाहनचालकाचा चुकून धक्का लागल्यास त्याच्यावर रेल्वेकडून गुन्हा दाखल करून दंड वसूल केला जातो. मात्र, आजच्या या घटनेमुळे उभे असलेले उघडलेले फाटकाचे खांब पडत असतील तर ते वाहनचालकांसाठी धोकादायक आहेत. आता या घटनेमुळे संबंधित अधिकाºयांवर रेल्वे प्रशासन गुन्हा दाखल करेल का?- महेंद्र मोरे, रहिवासी