शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमधील रस्ताच गेला चोरीला, ग्रामस्थाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 00:24 IST

रस्ता न करताच बिले काढल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले असल्याने तत्कालीन सरपंच व सदस्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.

विजय मांडेकर्जत : तालुक्यातील सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये चक्रावून सोडणारे एक प्रकरण समोर आले आहे. या ग्रामपंचायत हद्दीत ग्राम निधीमधून तयार केलेला एक रस्ताच चोरीला गेला आहे. एप्रिल २०१९ मध्ये नेरळ हेटकर आळी भागात एका काँक्रीट रस्त्याचे काम करून बिल काढण्यात आले होते. मात्र, आता तो रस्ताच त्या ठिकाणी नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. तसेच संबंधित रस्त्याचा शोध घेण्याची विनंतीही केली आहे. दरम्यान, रस्ता न करताच बिले काढल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले असल्याने तत्कालीन सरपंच व सदस्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या हेटकर आळी भागात अजित सावंत यांचे घर ते सुगवेकर वाड्यापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता व गटाराचे काम नव्याने होणार होते. यासाठी ग्राम निधीमधून दोन लाख ९० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा रस्ता झाला, पण तो केवळ कागदावरच. कारण प्रत्यक्षात हा रस्ता झालाच नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. तर नेरळ ग्रामपंचायतीमधून या रस्त्यासाठी १४ मे २०१९ रोजी दोन लाख ७५ हजार एवढे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. पण या रस्त्याच्या कामासाठी शासकीय नियम-अटींना तिलांजली देत काम करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कामाचे मूल्यांकन करणाऱ्या पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता असलेल्या मनीषा शीड यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर ज्यांचे या प्रकरणातील माजी उपसरपंच केतन पोतदार यांचा संपर्क झाला नाही.।ठेके दाराची नियुक्ती न करताच काम?नेरळ ग्रामपंचायतीमधून या रस्त्यासाठी १४ मे २०१९ रोजी दोन लाख ७५ हजार एवढे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. कोणतेही कार्यारंभ आदेश व ठेकेदाराची नियुक्ती न करताच कामाची घाई करण्यात आली, त्यामुळे रस्ता न करताच बिल काढल्याचे समोर आले. हा रस्ता तयार झाला, मग तो गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित करीतस्थानिक ग्रामस्थ देवा गवळीयांनी रस्ता चोरीला गेल्याचीतक्रार नेरळ ग्रामपंचायतीकडेकेली आहे.>या रस्त्याचे प्रकरण तत्कालीन सरपंच व सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या कार्यकाळातील आहे. या प्रकरणाची माहिती माझ्याकडे नाही. तेव्हा याबाबत चौकशी करून योग्य ती माहिती वरिष्ठ कार्यालयास दिली जाईल.- एम.डी. गोसावी,ग्रामविकास अधिकारी, नेरळ