शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

साइडपट्टी खोदल्याने रस्ता चिखलमय; नेरळ-कळंब दरम्यान वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:44 IST

वरई येथील गृहप्रकल्पासाठी २२ केव्हीची भूमिगत वीजवहिन्या टाकण्यासाठी पोशीर गावाजवळ रस्त्याची साइडपट्टी खोदण्यात आली आहे.

- कांता हाबळेनेरळ : नेरळ-कळंब या महत्त्वाच्या जिल्हा मार्गावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत असून वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. पोशीर गावाजवळ भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्त्याची साइडपट्टी खोदल्याने माती रस्त्यावर आली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल जमा झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.वरई येथील गृहप्रकल्पासाठी २२ केव्हीची भूमिगत वीजवहिन्या टाकण्यासाठी पोशीर गावाजवळ रस्त्याची साइडपट्टी खोदण्यात आली आहे. या भूमिगत वीजवाहिनीला स्थानिक नागरिक, शेतकरी, आणि चालकांनी विरोध दर्शविला आहे, तरीही हे काम सुरू करण्यात आले आहे. नियमबाह्य काम सुरू असून केवळ १३ ते १६ इंचावर ही २२ केव्ही इतक्या तीव्र क्षमतेची विद्युत वहिनी टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.खोदकाम करताना रस्त्याच्या कडेला शासकीय निधीतून लावलेली झाडेही नष्ट करण्यात आली आहे. साइडपट्टी खोदल्याने माती रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे रस्ता चिखलमय झाला असून दुचाकी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्यावर आलेली माती आणि चिखल बाजूला करावा आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी चालकांकडून होत आहे.रस्त्यालगतच्या कामासंदर्भात ठेकेदार कंपनीला आधीच नोटीस बजावली आहे. नुकसान झालेला रस्ता पूर्ववत करून द्यावा. रस्त्यावरील माती, चिखल दूर करण्याच्या सूचनाही ठेकेदार कंपनी आणि महावितरणला देण्यात आल्या आहेत.- अजयकुमार सर्वगोड,उपअभियंता बांधकाम विभागरस्त्याची साइडपट्टी खोदून ज्या ठिकाणी चिखल झाला आहे, त्या ठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे. रस्त्यावरील चिखल व नादुरुस्त झालेला रस्ता ठेकेदार कंपनीला पूर्ववत करण्यास सांगण्यात आले आहे.- आनंद घुळे,उप अभियंता, महावितरण-कर्जत

टॅग्स :Karjatकर्जत