शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महाड एमआयडीसीमधील रस्ता होणार खड्डेमुक्त; दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:38 IST

कामगारांचा प्रवास होणार सुखकर

बिरवाडी : महाड एमआयडीसीमधील नांगलवाडी फाटा ते पंचतारांकित औद्योगिक वसाहत या आठ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आले आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचा प्रवास सुखकर होणार आहे.

महाड एमआयडीसीमधील नागलवाडी फाटा ते पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आठ किलोमीटरच्या रस्त्यावर पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता व अन्य कामाकरिता सुमारे तीन लाख रुपयांचा निधी प्रतिवर्षी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांमध्ये रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे व गवत काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी सूत्रांनी दिली आहे. बाजारमूल्या पेक्षा नऊ टक्के रक्कम कपात करून ही कामे देत आहेत. एमआयडीसीमधील रस्ते दुरुस्तीच्या कामाला ठेकेदार लाभत नसल्याने एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती रखडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने अपघाताचे प्रमाण कमी होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले होते मात्र निवडणुका झाल्याने दुरुस्ती कामाला वेग आला आहे.भटक्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा; उपाययोजनेची मागणी

१) महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे दीडशे पेक्षा जास्त कारखाने कार्यरत असून या कारखान्यातून निर्माण होणारे उत्पादन हे परदेशात निर्यात करण्यात येते, त्यासोबतच महाराष्ट्र शासनाला हजारो कोटी रुपयांचा महसूल महाड औद्योगिक वसाहतीमधून प्राप्त होत आहे; मात्र या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास विलंब होत असल्याने या औद्योगिक वसाहतीचा विस्तार रखडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.२) महाड एमआयडीसीमधील नांगलवाडी फाटा ते पंचतारांकीत औद्योगिक वसाहत या किलोमीटरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा तारेचे बंदिस्त कंपाऊंड नसल्याने भटक्या जनावरांचा वावर मुख्य रस्त्यावर होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या समस्येकडे सबंंधितांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेroad transportरस्ते वाहतूक