शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काशिदमध्ये ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो प्रकल्प, मुरुडच्या पर्यटनाला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 04:33 IST

मुरुडच्या पर्यटनाला मिळणार चालना : जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ल्यांचा प्रवास होणार सुकर

अलिबाग : आता मुंबईतून पर्यटकांना आपली वाहने घेऊन थेट काशिद येथे येता येणार आहे. मेरीटाईम बोर्डाने तयार केलेल्या ११२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली असून आहे. समुद्राच्या लाटा थोपविण्यासाठी आवश्यक ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी आणि पॅसेंजर जेट्टी उभारण्याकरिताचा हा प्रस्ताव आहे.

सागरमाला प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरू करण्यात येणार असून यामुळे काशिद हे ठिकाण मुंबईशी जलमार्गानेही थेट जोडले जाणार आहे. सीआरझेड मॉनिटरिंग कमिटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रस्तावित काशिद रो-रो सेवेबाबत चर्चा होवून, प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वांती काशिद परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून पर्यटकांना सागरी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.सध्या खराब रस्ते, वाहतूककोंडीचा त्रास यामुळे सद्यस्थितीत मुंबईपासून चार ते पाच तासांचा प्रवास करून, रेवदंडा व काशिद येथे मुंबईकरांना अलिबाग मार्गे रस्त्यानेच जावे लागते. तितकाच वेळ परतीच्या प्रवासाला लागत असल्याने पर्यटक काशिदला जाणे टाळतात. मुंबई-पुण्यातील पर्यटकांसह देश-विदेशातील पर्यटक येथे येत असतात. रो-रो सेवेने मुंबई-काशिद थेट जोडले गेल्यास येथील पर्यटन व्यवसायाला मोठी गती मिळू शकणार आहे. काशिद रो-रो प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत.केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाची त्यास मान्यता मिळाली असून आता राज्य शासनाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. ही मान्यता प्राप्त झाल्यावर तत्काळ निविदा काढण्याचे काम सुरू होईल,अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.केंद्र शासनाकडून मंजुरी, दोन्ही जेट्टीसाठी १६ कोटीच्दोन्ही ठिकाणी नवीन जेट्टी बांधावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मेरीटाईम बोर्डाचे जंजिरा आणि पद्मदुर्ग येथे प्रत्येकी ८ कोटी रु पये अंदाजित खर्चाच्या जेट्टी बांधण्याचा आराखडा केंद्र शासनाला सादर केला होता. यास केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी आगरदांडा येथे बांधण्यात येणाºया जेट्टीचे कम पूर्ण झालेले आहे. मात्र, जंजिरा किल्ल्यामध्ये जेट्टी नसल्याने तेथे पर्यटकांना लहान होड्यांमधून उतरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. आतापर्यंत लहान होड्यांमधूनच प्रवास करावा लागत होता. जेट्टी झाल्यानंतर मोठ्या होड्याही किल्ल्यांपर्यंत जावू शकणार आहेत. सागरमाला प्रकल्पांतर्गतच या जेट्टी बांधण्यात येत आहेत. या दोन्हीसाठी एकूण १६ कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत. पर्यटकांची सुरक्षा हा दृष्टिकोन ठेवून या दोन्ही जेट्ट्या उभारल्या जाणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.जंजिरा, पद्मदुर्ग किल्ल्यांसाठी नवीन जेट्टीजंजिरा आणि पद्मदुर्ग हे जलदुर्ग पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांच्या बिनधोक व सुकर प्रवासाकरिता मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ल्याच्या परिसरात दोन्ही ठिकाणी प्रत्येकी आठ कोटी रुपये खर्चून नवीन जेटी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जंजिरा आणि पद्मदुर्ग या दोन जलदुर्गांना भेट देण्याकरिता जलप्रवास करताना विद्यमान परिस्थितीत पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. लाटांमुळे होड्या अस्थिर होत असल्याने चढ-उतरताना पाय घसरून पाण्यात पडण्याच्या घटना घडत असतात.च्लहान मुले, वयोवृद्ध, महिला यांना होडीतून उतरणे कठीण जाते. अशाही परिस्थितीत जंजिरा आणि पद्मदुर्ग या दोन जलदुर्गांना भेट देणाºया पर्यटकांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ विचारात घेवून या दोन नव्या जेट्टी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग