शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

सह्याद्रीवाडीला भूस्खलनाचा धोका; ग्रामस्थ भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:10 IST

१३ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर; भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून लवकरच पाहणी

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील आंबेशिवथर गावाच्या वरील बाजूस असलेल्या दुर्गम अशा सह्याद्रीवाडी या धनगरवस्तीत जमिनीला भेग पडल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून, ग्रामस्थांनी आपली घरे सोडून डोंगराखाली स्थलांतर केले आहे. त्यांच्या वाडीवरील काही ग्रामस्थांची घरे आंबेशिवथर गावाजवळ असल्याने या पाच घरात सह्याद्रीवाडीवरील जवळपास १३ कुटुंबे एकत्रित राहत आहेत.महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावापासून दोन किलोमीटर उंच डोंगरावर सह्याद्रीवाडी (धनगरवाडी) वसाहत आहे. गेली दीडशे वर्षे हे लोक या ठिकाणी राहत असून, याठिकाणी १३ घरे आहेत. गेला आठवडाभर पडत असलेल्या पावसाने जमिनीला भेगा पडल्याचे दिसून आले. या वाडीवर घरांपासून जवळपास साधारण ३० फूट अंतरावर जमिनीला तडे गेले आहेत. यामुळे जमीन खचते की काय अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. पावसाची संततधार आणि जमिनीला पडलेल्या भेगा पाहून स्थानिक प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. आंबेशिवथर गावाजवळ सह्याद्रीवाडीवरील काही लोकांनी दोन वर्षांपूर्वी घरे बांधली आहेत. त्या ठिकाणी सध्या हे ग्रामस्थ रहात आहेत.भेगा पडून जमीन खचल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार यांना कळताच त्यांनी त्वरित सह्याद्रीवाडी, आंबेशिवथर, पारमाची या गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सपना मालुसरे, गटविकास अधिकारी मंडलिक, विस्तार अधिकारी वाघमोडे, माजी सरपंच सुभाष मालुसरे, आंबेशिवथरचे सरपंच विठ्ठल मालुसरे यांनी वाडीतील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करून भविष्यात पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.विद्यार्थ्यांची डोंगरावरून पायपीटआंबेशिवथर गावापासून दोन किमी अंतरावर डोंगरात वसलेल्या सह्याद्रीवाडीत सुमारे पंधरा घरे असून ७८ ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या राहात आहेत.जवळपास २२ विद्यार्थ्यांना विद्यालयीन शिक्षणासाठी दररोज पायपीट करावी लागते, तर काही ग्रामस्थ माणगाव आणि गोरेगाव येथे मजुरीसाठी जातात. सह्याद्रीवाडीत रस्ता, पिण्याचे पाणी, अशा मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ हलाखीचे जीवन जगत आहेत.सद्यस्थितीत सह्याद्रीवाडीतील सर्व ग्रामस्थांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था मंदिर आणि शाळांतून करण्यात आली आहे. परिसराची पाहणी भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून होईपर्यंत ग्रामस्थांचा मुक्काम येथेच राहील.- प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार,महाड

टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगड