शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहतुकीमुळे महामार्गावर अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:46 IST

क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत असून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारे वाहतूक करणाऱ्या वाहनचालक आणि वाहनधारकांवर कारवाई होणे गरजेच आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे आहे.मुंबई-गोवा मार्गावर अशा ओव्हरलोड वाहनांना कोणतीही नियमावली नसल्याने राजरोसपणे वाहनांमध्ये गरजेपेक्षा जास्त क्षमतेचा माल भरून नेला जातो. गाड्या या मार्गावरून नेताना हे वाहनचालक दुचाकी वाहनांची पर्वा करत नाहीत. अनेक वेळा भाताचा कोंडा, भाताचे तुशे, पेंडा हे वीटभट्टीसाठी नेत असताना, त्या वाहनांमधून ओव्हरलोड भरलेला भाताचा तुसा किंवा भाताचा भुसा हे सर्व रस्त्यावर पडत असते. तसेच भाताचा तुसा हा वाºयाने उडून दुचाकीस्वाराच्या डोळ्यात जातो. त्यामुळे दुचाकीचे अपघात होतात. यामुळे एखादी मोठी दुघटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.प्रत्येक मालवाहू वाहनाची मालवाहून नेण्याची क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे या वाहनांमध्ये कंपनीने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच मालाची वाहतूक करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केली जाते. या प्रकारामुळे अनेक वेळा अपघात होतात. अशा वाहनचालक तसेच गाडीमालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.