शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी घोषित केलेले बक्षिस आजही स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 02:37 IST

स्पर्धात्मक परीक्षेतील यशााची गुरूकिल्ली मिळाली, पनवेल प्रादेशिक परिवहन विभागात उपप्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत

पनवेल : राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागात पहिल्या बॅचच्या महिला अधिकारी हेमांगीणी पाटील या सध्या पनवेल प्रादेशिक परिवहन विभागात उपप्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत . माळेगाव सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पाटील या जिद्दीच्या जोरावर आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर रु जू झाल्या आहेत . या संपूर्ण प्रवासात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे हेमागिंणी सांगतात.हेमागिंणी पाटील यांनी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील अविस्मरणीय आठवणीना उजाळा दिला. मालेगाव येथील रेणुका भाऊसाहेब हिरे (आरबीएच) या कन्याशाळेत शिकत असताना गणित विषय शिकविणारे आमचे शिक्षक दिनेश पवार हे आम्हाला नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. आम्ही दहावीत असताना पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी १५0 रूपये बक्षिस देण्याचे जाहिर केले होते. बक्षिसाची रकम फार मोठी नसली तरी ती प्रत्यक्ष सरांनी जाहिर केल्याने आमच्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ती मौलवान होती. त्यामुळे हे मीच मिळविणार असा चंग मी बांधला. त्यानुसार कसून अभ्यास केला. अखेर दहावीच्या परीक्षेत गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवून हे बक्षिस मी पटकाविले. या प्रसंगाने माझ्यात वेगळी जिद्द निर्माण झाली. कोणतेही आवाहन अशक्य नसते, याचा मला बोध झाला.कुटुंबियांसह शिक्षकांचे योगदान मोठेमहाविद्यालयीन शिक्षणानंतर एमपीएसीसीची परीक्षा देताना मला त्याचा फायदा झाला. त्यामुळेच माझ्या जडणघडणीत कुटुंबासह शिक्षकांचाही मोठा वाटा असल्याचे हेमागिंणी पाटील सांगतात. प्रादेशिक परिवहन विभागात कार्यरत असताना ठाणे विभागाची चोख जबाबदारी पार पाडली.सध्याच्या घडीला पनवेल प्रादेशिक परिवहन विभागात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून त्या काम करीत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना अबोली रिक्षाचे परिमट वाटप करण्याचे धोरण राज्य सरकारने जाहिर केले. या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी हेमांगिणी पाटील यांचे योगदान मोठे आहे . एमएमआरडीए विभागात तब्बल १३00 पेक्षा जास्त महिलांना अबोली रिक्षाचे परिमट वाटप करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे.जुन्या वाहनांच्या लिलावात महत्वाचे योगदानपनवेल प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करून ७0 लाखांचा महसूल वसूल केला आहे. आपल्या जडणघडणीत आपल्या कुटुंबासह शिक्षकांचा वाटा मोठा असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.

टॅग्स :RaigadरायगडpanvelपनवेलTeachers Dayशिक्षक दिन