शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा रायगडला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:04 IST

५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील भात पीकाची नासाडी : तलाठी व कृषी कर्मचाऱ्यांच्या समन्वयाअभावी नुकसानी पंचनामा करण्यात दिरंगाई

- जयंत धुळप 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेले चक्रिवादळ आणि गुरुवारी झालेल्या परतीच्या पावसासह सोसाट्याच्या वाºयांमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी म्हसळा येथे सर्वाधिक ३० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर अन्यत्र माणगाव -१२, पनवेल-२९, पोलादपूर-२२, रोहा-२१, श्रीवर्धन-१० तर तळा येथे ११ मि.मी. झालेल्या पावसान भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाकडे प्रत्यक्ष पंचनामाअंती उपलब्ध माहितीनुसार, महाड तालुक्यातील १८१ शेतकºयांच्या ५१.८४ हेक्टर, माणगाव तालुक्यात ११२ शेतकºयांच्या ४५ हेक्टर, अलिबाग तालुक्यात २०० शेतकºयांच्या १८१ हेक्टर, तर पेण तालुक्यात सर्वाधिक ८०० शेतकºयांच्या एक हजार ४८० हेक्टर भातशेतीचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या जिल्ह्यातील चक्रिवादळात नेमक्या किती शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले, याची माहिती कृषी विभागाकडे अद्याप उपलब्ध नाही. तर शुक्रवारी झालेल्या परतीच्या पावसाच्या नुकसानीची देखील नेमकी माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. महसूल विभागाचा प्रतिनिधी असणारा ‘तलाठी’ आणि कृषी विभागाचा कर्मचारी यांच्या संयुक्त समन्वयातून नुकसानी पंचनामा होत असतो. मात्र, तलाठी आणि कृषी कर्मचारी यांच्या समन्वयाअभावी पंचनामा होऊ शकला नसल्याने नुकसानग्रस्त शेतकºयांमध्ये मोठी नाराजी दिसून आली.

भात पीक नुकसानाचा पंचनामा होत नाही, तोपर्यंत शेतातील पडलेले भात पीक शेतकºयांना कापून आणता येत नाही. पंचनाम्यांना उशीर होत असल्याने शेतात पडलेले भात पीक पाण्यात कुजून पीक नुकसानात वाढ होते. मात्र, त्याची नोंद पंचनाम्याच्या वेळी होत नसल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांना मोठा भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती महाडमधील शेतकरी सदाशिव शिर्के यांनी दिली.गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या चक्रिवादळात शेतातील उभे आणि दाणा भरण्याच्या अवस्थेतील भात पीक शेतात झोपले. त्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत आणि विजयादशमीच्या दिवशी आलेल्या पावसात ते भात पीक पूर्णपणे भिजून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. यांची सरकार डबल नुकसानभरपाई देणार का, असा सवाल अलिबागमधील शेतकरी द्वारकानाथ पाटील यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rainपाऊस