शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीसीटी बंदर खासगीकरणाच्या ठरावाचा डाव उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 03:04 IST

कामगार संघटनांच्या विरोधाला यश; जोरदार निदर्शने, घोषणाबाजीमुळे प्रशासनाने प्रस्ताव पुढे ढकलला

उरण : जेएनपीसीटी बंदराचे खासगीकरण करण्याचा डाव कामगार, कामगार संघटना, कामगार ट्रस्टी यांनी केलेल्या जोरदार विरोधानंतर अखेर हाणून पाडला. बोर्ड आॅफ ट्रस्टींच्या बैठकीतच केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन्ही कामगार ट्रस्टींनी मंजुरीसाठी अजेंड्यावर आणलेल्या ठरावावर दोन्ही गटांकडून जोरदार खडाजंगी झाली. जेएनपीसीटी बंदरांचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाला पुढे ढकलावा लागला आहे.जेएनपीटीच्या मालकीचे एकमेव उरलेल्या बंदराचेही खासगीकरण (पीपीपी) करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने जेएनपीटीच्या गुरुवार, ८ आॅक्टोबर रोजी आयोजित बोर्ड आॅफ ट्रस्टींच्या बैठकीत आणला होता. खासगीकरणाला याआधीच विरोध दर्शविलेल्या कामगार आणि कामगार संघटनांनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच प्रशासन भवनाच्या प्रवेशद्वारावरच एकत्रित येऊन जेएनपीटी आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता. याच वेळी बोर्ड आॅफ ट्रस्टींची बैठक पद्धतीने सुरू झाली होती. एकीकडे कामगारांच्या दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष बबन पाटील, कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली घोषणाबाजी सुरू होती. दुसरीकडे बैठकीत कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, भूषण पाटील हे बोर्ड आॅफ ट्रस्टींच्या बैठकीत खासगीकरणाच्या विरोधात लढत होते. जेएनपीटीसी बंदराचे खासगीकरण करण्याऐवजी बंदर जेएनपीटीनेच चालवावे. त्यासाठी बंदरातच ७८० कोटी खर्चाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी स्पष्ट भूमिकाही कामगार ट्रस्टींनी बैठकीत मांडली. मात्र जेएनपीटीचे शासकीय नियुक्त ट्रस्टी ऐकण्यास राजी नव्हते. कामगार ट्रस्टींनी खासगीकरणाविरोधात घेतलेली ठोस भूमिका आणि कामगारांची घोषणाबाजी यामुळे प्रशासनाला नमते घेण्याची वेळ आली.‘तीस दिवस बंदराचे कामकाज ठप्प करू’काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राज्यातील महाआघाडीच्या सर्वच नेत्यांची भेट घेऊन केंद्र सरकारने चालविलेल्या जेएनपीसीटी बंदराच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्याचे आश्वासन महेंद्र घरत यांनी दिले. खासगीकरण रोखण्यासाठी प्रसंगी ३० दिवस बंदराचे कामकाज ठप्प करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

टॅग्स :JNPTजेएनपीटी