शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

‘त्या’ १४ खलाशांची सुटका; जहाजावर काढली रात्र; कोस्ट गार्डने केले सर्च ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 06:38 IST

रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात गुरुवारी जयगड पोर्टकडे जाणारे जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे मालवाहू जहाज भरकटले होते. नांगर टाकून हे जहाज थांबविण्यात आले होते. २४ तासांहून अधिक काळ खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या १४ खलाशांची अखेर शुक्रवारी सुटका करण्यात आली. या खलाशांना कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमधून सुखरूप किनाऱ्यावर आणले.

रायगड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला होता. दरम्यान, यावेळी अलिबागमधील धरमतर येथून जयगड पोर्टवर माल घेऊन निघालेले जे. एस. डब्ल्यू. कंपनीचे मालवाहू जहाज खवळलेल्या समुद्रात भरकटले. कुलाबा किल्ल्याजवळ  जहाजचालकाने प्रसंगावधान दाखवून, नांगर टाकून जहाज थांबविले. जहाज भर समुद्रात अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच १४ जणांच्या सुटकेसाठी कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. मात्र, काळोख आणि धो-धो पावसामुळे मदतकार्यात बाधा आली. त्यामुळे १४ खलाशांनी संपूर्ण रात्र ही जहाजात काढली. 

कोस्ट गार्डने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सर्च ऑपरेशन सुरू करून जहाज गाठले. हेलिकॉप्टरमधून प्रथम कोस्ट गार्डचे पथक जहाजावर उतरले. त्यांनी सात फेऱ्यांद्वारे कॅप्टन कालियामूर्ती पेरुमल (मास्टर), ठाकूर विजय सिंह (चीफ ऑफिसर), गौरव चौधरी (सेकंड ऑफिसर), अँटोनी कोल्लमपरंबिल अंतप्पान (चीफ इंजिनिअर), अलरी राज ज्ञान अर्पुथा राज (सेकंड इंजिनिअर), तनुषकुमार चिथिराय पंडी (थर्ड इंजिनिअर), अंबाडी माधव, विलिस्टन डेनिस, प्रभात कुमार, विराज विश्वनाथ मेहेर, पीयूष लेंका, अभिषेक सिंह, अभय यादव, निलाद्री अधिकारी यांना सुखरूप समुद्रकिनारी आणले. या सर्च ऑपरेशनवेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांसह आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

जहाज समुद्रात भरकटल्यानंतर १४ खलाशांच्या सुटकेसाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. सोसाट्याचा वारा, पावसाचा मारा सहन करत खलाशांचे बचावकार्य केले.

टॅग्स :Raigadरायगड