शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनातून वगळण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन, पेन्सील नोंदी रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:29 IST

बिरवाडीमधील सांडपाणी थेट काळ नदीपात्रात जात असल्याने काळ नदीचे पाणी प्रदूषित होऊन प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी, काळीज,आमशेत येथील महाड व अतिरिक्त महाड औद्योगिक क्षेत्र जमीन भूसंपादनातून वगळणे, तसेच इतर समस्यांचे निराकरण करण्याबाबत बिरवाडीतील नागरिक विनोद पारेख यांनी राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे, तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना लेखी निवेदन दिले आहे.निवेदनात पाच प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या सात-बारावर एमआयडीसी पेन्सील नोंद रद्द करणे, बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावठाण क्षेत्र वाढवणे, भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगार देणे, बिरवाडीत कायमस्वरूपी सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, एमआयडीसी महाडचे नामांतर करून एमआयडीसी बिरवाडी करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.मागण्यांची पूर्तता न झाल्यास व्यापारी विनोद पारेख, माजी राजिप सदस्य कृष्णा घाग, माजी उपसरपंच अरुण पवार, बिरवाडी ग्रामपंचायत सदस्य अनंत पवार, चंद्रकांत पोळ, मधुकर शेडगे, अशोक कदम यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.पाच वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू असून, मागण्यांची अद्याप पूर्तता होत नसल्याने एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढून चक्का जाम करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांचे शिष्टमंडळ लवकरच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडणार आहे. बिरवाडीमधील सांडपाणी थेट काळ नदीपात्रात जात असल्याने काळ नदीचे पाणी प्रदूषित होऊन प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शेतकºयांच्या जमिनीवर एमआयडीसीच्या पेन्सील नोंदी असल्याने कोणताही उद्योग, व्यवसाय या जमिनीवर शेतकºयाला करता येत नाही.- महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामस्थांच्या मागण्या मार्गी लागतील, असा विश्वास ग्रामस्थांना आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांची व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन ग्रामस्थ आपली भूमिका मांडणार असल्याने या परिसरातील विकासाला चालना मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे