शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

अवयवदान केल्याने मिळणार माणसाला पुनर्जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:00 IST

पुनर्जन्म आहे किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु आज देशाची परिस्थिती पाहता अवयवदान केले तरच त्यांना पुनर्जन्म मिळण्याची शक्यता वाटत आहे.

मुरुड जंजिरा : पुनर्जन्म आहे किंवा नाही हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु आज देशाची परिस्थिती पाहता अवयवदान केले तरच त्यांना पुनर्जन्म मिळण्याची शक्यता वाटत आहे. देशात २२ लाख डोळ्यांची गरज आहे. मात्र, मिळतात फक्त साडेअकरा लाख. साडेअकरा हजार किडन्या आवश्यक आहेत. ७२ हृदयांची गरज आहे. वर्षाला ९0 लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी ४९ हजार लोकच नेत्रदान करतात. अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण सहसंचालक पद्मश्री तात्याराव लहाने यांनी मुरु ड येथे केले.संजीवनी आरोग्य सेवा समिती मुरुड यांच्या वतीने व विविध सामाजिक संघटना यांच्यामार्फत डॉ. पद्मश्री तात्याराव लहाने यांचा नागरी सत्कार शहरात बाजारपेठेतील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार पंडित पाटील, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, संजीवनी आरोग्य संघटनेचे अध्यक्ष विजय सुर्वे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सभापती नीता घाटवळ, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार,उपनगराध्यक्ष नौशीन दरोगे, डॉ. रागिणी पारेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ,नगरपरिषद विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर,चंद्रकांत अपराध, नगरसेवक मनोज भगत, तहसीलदार उमेश पाटील, डॉ. प्रवीण बागुल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.लहाने म्हणाले, अवयवदानाचे सर्वात जास्त महत्त्व श्रीलंकेला कळले आहे. श्रीलंकेत एक लाख लोक मृत्युमुखी पडत असतील तर दोन लाख डोळे मिळतात. मृत्यू झालेल्या व्यक्तीस जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा त्याचे अवयव दुसºया व्यक्तीच्या कामास येत असतील तर त्याला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. लोकांनी गरज ओळखून काळानुरूप पावले टाकणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डोळे चांगले राहण्यासाठी डोळ्यांना अ जीवनसत्त्व मिळण्यासाठी गाजर, पपई व शेवग्याच्या शेंगा आहारात वापराव्यात, असे आवाहनसुद्धा या वेळी त्यांनी केले.आमदार पंडित पाटील म्हणाले की, डॉ. लहाने यांनी खºया अर्थाने समाजाची सेवा केली आहे. आज आरोग्य विभागातील ५0 टक्के पदे भरली जात नाही. या सरकारने पूल बांधण्यापेक्षा लोकांच्या आरोग्यावर जास्त रक्कम खर्च करावी, असे ते या वेळी म्हणाले. शालेय पोषण आहार योजनेतून खराब तेलाचा वापर झाल्याने रायगड जिल्ह्यातील १०८ विद्यार्थ्यांना हृदयविकार झाला आहे. त्यामुळे सदरची योजना बंदच करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. लोकांनी भजन, कीर्तनाबरोबरच आरोग्यावर जास्त लक्ष देऊन नियमित व्यायाम करण्याचाही सल्ला या वेळी आमदार पाटील यांनी दिला.