शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

सायन-पनवेल महामार्गाची दुरुस्ती तकलादू

By admin | Updated: July 24, 2015 03:19 IST

१२०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्या पावसातच महामार्गावर मोठमोठे खड्डे

वैभव गायकर, पनवेल१२०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या सायन-पनवेल महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्या पावसातच महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानंतर ते खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र पावसाने लावलेल्या दमदार हजेरीनंतर दुरुस्तीचे हे काम तकलादू असल्याचे उघड झाले आहे. सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरणाचे काम जे. एम. म्हात्रे इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि या कंपनीला देण्यात आले होते. या महामार्गाचे रुंंदीकरण करताना दोन्ही बाजूंना पाचपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. नव्याने पाच उड्डाणपूल सानपाडा, नेरुळ, उरणफाटा, कामोठे व खारघर कामोठ्याला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा समावेश आहे. पहिल्या पावसातच सर्व उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले होते. यावेळी अनेक लहान-मोठे अपघात देखील झाल्याने वाहनचालकांनी देखील याबाबत मोठी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हे खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले, मात्र पुन्हा एकदा या उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. पैकी उरणफाटा उड्डाणपुलावर सर्वात जास्त खड्डे पडलेले असून याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कामोठे, सानपाडा, नेरुळ तसेच खारघरजवळील उड्डाणपुलावर हीच अवस्था असल्याचे पाहावयास मिळत आहे. वाशी टोलनाक्यापासून कळंबोली सर्कलपर्यंत हे खड्डे अधून-मधून पाहावयास मिळत आहेत. महामार्गावरील झालेला खर्च वसूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल टोलवेज प्रा. लि. या कंपनीला टोलवसुलीसाठी ठेका दिलेला आहे. मात्र टोल वसूल करून देखील महामार्गावर देखरेखीकडे दुर्लक्ष होताना दिसते.संपूर्ण काँक्रिटीकरण करून उभारलेल्या या मार्गाचे अजूनही काम काही ठिकाणी अर्धवटच ठेवण्यात आले आहे. कामोठे शहरालगत उभारलेल्या उड्डाणपुलाचे काम खारफुटीमुळे रखडले आहे. शहरामधून बाहेर पडण्यासाठी कामोठे बस थांब्यापासून उड्डाणपुलावरून जाण्याचा खडतर मार्ग यासाठी पार करावा लागतो. याठिकाणाहून जाताना अनेक अपघात घडत असतात. कोपरा गाव, हिरानंदानी उड्डाणपुलाखाली, नेरुळ याठिकाणी कामे अर्धवट ठेवली असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.