शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाताळगंगा पुलाची दुरवस्था; वाहतूक मंद गतीने होत असल्याने कोंडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:21 IST

खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान । प्रवासी त्रस्त; चालक हैराण

राकेश खराडे मोहोपाडा : औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पाताळगंगा पुलाची बिकट अवस्था झाली असून या पुलाला जागोजागी खड्डे पडून काही ठिकाणी लोखंडी प्लेट्स व शिगा बाहेर आल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सायंकाळनंतर दुचाकी चालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आपटून अपघात होत आहेत. पुलाची याअगोदर अनेकदा थातुरमातुर डागडुजी करण्यात आली होती, परंतु पावसाळा सुरू झाला की परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.

हा पूल बांधून ३६ वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले असून पुलावर उभे राहिल्यास वाहन जात असताना पूल दुभंगला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या पुलाचा भाग खचल्याने अवजड वाहन पाताळगंगा नदीत कोसळल्याची घटना घडली होती. वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. पाताळगंगा क्षेत्राकडे दांड-रसायनीहून जाण्यासाठी पाताळगंगा नदीवर हा एकमेव पूल आहे. या पुलावरुन दैनंदिन शेकडो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. या पुलाला पर्याय म्हणून दुसºया पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल असे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या रहदारीसाठी जुन्याच पुलाचा वापर होत असल्याने या पुलावरून दुचाकी चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधितांनी जुन्या पुलाचे काम करुन भविष्यातील धोका टाळावा तसेच नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.कायमस्वरूपी काम करण्याची मागणीऔद्योगिक क्षेत्राला जोडणारा पाताळगंगा हा एकमेव पूल असून या रस्त्यावरुन शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असते. पाताळगंगा पुलाची दुरवस्था होवून लोखंडी प्लेट्स ,स्टील रॉड बाहेर आल्याने वाहनांचे नुकसान होवून अपघात होत आहेत. खड्ड्यात वाहन आदळल्याने काहींना कंबरदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी येथून नियमित प्रवास करणाºया नागरिकांकडून होत आहे असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.दुचाकीस्वार त्रस्तया पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर एखादे मोठे वाहन या पाण्यातून गेले तर दुचाकीवरून आलेल्या वाहन चालकाच्या अंगावर हे साचलेले पाणी उडत आहे. यामुळे दुचाकीस्वारांना येथून प्रवास करताना जपून जावे लागत आहे.