शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानपद डोक्यातून काढून टाका; शिवसेना सरकारमध्ये समाधानी नाही- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 18:45 IST

कर्जत : सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे 2019 हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते , असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी पंतप्रधान बनण्याचा विचार डोक्यातून ...

ठळक मुद्देपंतप्रधानपद डोक्यातून काढून टाकाशिवसेना सरकारमध्ये समाधानी नाहीराहुल गांधी यांच्याकडे कौशल्य आहे

कर्जत : सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे 2019 हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी पंतप्रधान बनण्याचा विचार डोक्यातून काढून टाका. प्रफुल्ल पटेल यांनी हा मुद्दा उगाच उपस्थित केल्याचे ते म्हणाले. कर्जतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिंतन शिबीराप्रसंगी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मला दहा दिवसांपूर्वी भेटले. त्यांनी तुमची राजकीय भूमिका काय आहे असे विचारले. यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा, आम्ही आमची भूमिका जाहीर करतो. यावरुन मला असे वाटतेय की, सध्या भाजपा सरकारमध्ये शिवसेना समाधानी नाही. याबरोबर आम्ही फक्त फक्त समविचारी पक्षांशी युती करु, असे शरद पवार यांनी सांगितले.  उद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष महाराष्ट्रात वाढवायचा आहे. भाजपाला दूर ठेवून पक्षवाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडतील, अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे कौशल्य आहे. कष्ट करण्याची तयारी आहे. मात्र, त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे.  सध्या राहूल गांधी यांच्या सभांना जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियामध्येही राहूल यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळेच भाजपा सुद्धा राहूल यांना गांभिर्याने घेऊ लागला आहे, असेही शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार