शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामआरोग्य शिबिरामुळे दिलासा

By admin | Updated: December 19, 2015 02:26 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमएसीईटीपी को. आॅपरेटिव्ह सोसायटीतर्फे सुरू असलेल्या ग्रामआरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरामुळे दुर्गम ठिकाणच्या रुग्णांना मोफत

महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमएसीईटीपी को. आॅपरेटिव्ह सोसायटीतर्फे सुरू असलेल्या ग्रामआरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरामुळे दुर्गम ठिकाणच्या रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होवू शकल्यामुळे या दुर्लक्षित घटकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. एमएमएसीईटीपीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार दि. अण्णासाहेब सावंत को-आॅपरेटिव्ह अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत यांनी काढले.एमएमएसीईटीपी आणि सत्यसाई सेवा ट्रस्ट यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सुविधांनी सज्ज अशा मोबाइल व्हॅनद्वारे गेल्या आॅगस्ट महिन्यात सुरू झालेल्या ग्रामआरोग्य शिबिराचा शतकपूर्ती समारंभ गुरुवारी पार पडला. एस. बी. पाठारे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संघटनेतर्फे हा सेवाभावी उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील अत्यंत दुर्गम ठिकाणच्या वाड्यावर आजही असंख्य रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत ही आरोग्य सेवा पोहोचणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाला प्रत्येक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केवळ साडेतीन महिन्यांच्या काळात शंभर ग्रामआरोग्य शिबिरातून ६००० रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले. एमआयडीसी असेपर्यंत आरोग्य सेवेचा हा उपक्रम असाच अखंडपणे सुरु राहील अशी ग्वाही देखील पठारे यांनी यावेळी दिली. यावेळी डीवायएसपी प्रांजली सोनावणे तहसीलदार संदीप कदम, सत्यसाई सेवा ट्रस्टचे रमेश सावंत, अमृत गोराई आदींनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)