शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

रायगड जिल्ह्यातील शाळा पाठवतात नियमित अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 23:20 IST

शिक्षणाधिकारी कल्पना काकडे यांचा दावा

रायगड :  जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा आता सुरू झाल्या आहेत. दाेन हजार १७ पैकी एक हजार ८३७ शाळा सुरू आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यापही उल्लेखनीय असल्याचे दिसत नाही. सुरू झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतचा अहवाल शाळांकडून नियमितपणे येत असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कल्पना काकडे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.काेराेनाचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच लसदेखील बाजारात आलेली आहे. त्यामुळे काेराेनाची भीती आता कमी झाल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये याआधीच सुरू करण्यात आलेली आहेत. त्यानंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये किती शाळा आहेत, त्यापैकी किती सुरू झाल्या, किती विद्यार्थ्यांपैकी किती उपस्थिती आहे. शिक्षकांसह, कर्मचाऱ्यांची चाचणी केली आहे का, यासह अन्य बाबतची माहिती शाळांना भरून द्यावी लागत आहे. त्यानंतर ती माहिती शिक्षण विभागामार्फत सरकारला सादर केली जाते. ऑनलाइन पध्दतीने सर्व माहिती भरावी लागते. काही वेळेला इंटरनेट धिम्या गतीने सुरू असल्याने अहवाल पाठवण्यास उशीर हाेताे; मात्र सरकारला परिपूर्ण अहवाल पाठवण्यात येत असल्याकडे काकडे यांनी लक्ष वेधले. आमच्यामार्फत वेळेवर आणि नियमीत अहवाल देण्यात येताे. नेटवर्कची विशेष अडचण येत नाही असे आंदाेशी मुख्याध्यापक सुनील थळे यांनी सांगितले.ऑनलाइन अहवालशाळांना ऑनलाइन अहवाल द्यावा लागत आहे. मात्र काही ठिकाणी इंटरनेट धिम्या गतीने अथवा बंद असल्याने वेळेत अहवाल देता येत नाही. अशावेळी शिक्षण विभाग संबंधित शाळांकडून माहिती घेऊन ती ऑनलाइन पध्दतीने सरकारला सादर करते.जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन अहवाल पाठवताना काही शाळा व्यवस्थापनांना अडचण येते, मात्र आम्ही त्यांच्याकडून परिपूर्ण माहिती प्राप्त करुन घेताे. त्यानंतर आम्ही सरकारला ऑनलाइन अहवाल सादर करताे.-कल्पना काकडे (शिक्षणाधिकारी,प्राथमिक)शाळा व्यवस्थापनाकडून केंद्रप्रमुखांना ऑनलाईन अहवाल सादर करण्यात येताे. कधी-कधी नेटवर्क खराब असल्याने अडचण येते. त्यावर मात करून आम्ही अहवाल वेळेवर पाठवताे..रेश्मा वारगे (मुख्याध्यापक, भाल)तालुकानिहाय अहवाल देणाऱ्या शाळाअलिबाग-१३९पेण-११७पनवेल-४१७उरण-६९कर्जत-२९०खालापूर-१३६पाेलादपूर-६७महाड-२२७माणगाव-१०७राेहा-१२२म्हसळा-७९श्रीवर्धन-६३मुरुड-६२सुधागड-६४तळा-५५