शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

लालपरीतील अग्निशमन यंत्रणा गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:17 IST

पनवेल एसटी आगारातील प्रकार :  वायफाय केवळ नावालाच, महामंडळाने लक्ष देण्याची गरज

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : अलीकडे राज्यात बसेसना आग लागल्याच्या घटना घडत आहेत. अशावेळी बसमधील अग्निशमन यंत्रणा निकामी झालेली असते किंवा अग्निशमन यंत्रणाच गायब झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर बसमधील चालक-वाहक तसेच प्रवाशांना नियंत्रण मिळविता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पनवेलमधील बस आगाराच्या अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या.पनवेल बस आगाराची नव्याने निर्मिती केली जाणार आहे.  दररोज ३००० हजार पेक्षा जास्त बसेस विविध ठिकाणांहून आगारात ये-जा करीत असतात.  मात्र बसमधील अपुऱ्या सुविधा व अत्यावश्यक वेळेला उद‌्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रवाशांसाठी लाल परीत प्रवास असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. याकरिता महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नव्या बसेस सोडल्या तर बहुतांशी बसेसची दयनीय अवस्था आहे.

प्रथमोपचार पेट्या रिकाम्याआगारात बहुतांशी बसमध्ये  केलेल्या तपासणीत प्रत्येक बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या आढळल्या. मात्र त्या  रिकाम्या असल्याने या प्रथमोपचार पेट्या केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक परिस्थितीत कोणाला प्राथमिक उपचार देण्याची वेळ आली तर बसमधील कर्मचाऱ्यांना हातावर हात धरून राहण्यापलीकडे काहीच करता येणार नसल्याचे  दिसून येत आहे.बॉक्स गायब झाल्याचे चित्र एसटी महामंडळाने बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अनेक बसमधून वायफाय बॉक्स गायब झालेले आहेत. ज्या ठिकाणी हे बॉक्स उपलब्ध आहेत ते बंद अवस्थेत असल्याचे पहावयास मिळत आहे.बसमधील वायफाय सध्या बंद आहेत. मात्र ज्या बसमध्ये प्रथमोचार पेट्यांमधील साहित्य संपले आहे त्याची माहिती देण्याची सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. अशा प्रथमोपचार पेट्यात त्वरित साहित्य पुरविले जाईल. ज्या बसमधील अग्निशमन यंत्रणा सुरळीत नाही अशा बसची पाहणी केली जाईल.- मोनिका वानखेडे आगारप्रमुख, पनवेल एसटी बस आगार

अडगळीच्या जागेचा अयोग्य वापरnआगारात प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र अनेक वाहने सर्रास डेपोमध्ये पार्किंग केली जात आहेत.  विशेषतः आगारातील अडगळीच्या ठिकाणी काही बेजबाबदार नागरिक सर्रास लघुशंका करताना नजरेस पडतात. प्रवासी , फेरीवाले तसेच एसटी कर्मचारी मास्कचा योग्य वापर न करता आगारात वावरत असल्याचे दिसून येत आहेत.nबसचालकांचे आसनच मोडकळीस आलेले संपूर्ण प्रवाशांचे स्टेअरिंग ज्या बसचालकाच्या हातात असते त्या बसचालकाचे आसनच मोडकळीस आलेले बसच्या पाहणीत पहावयास मिळाले. वर्षानुवर्षे अशा दुरवस्था झालेल्या आसनावर बसूनच चालक वाहन चालवत असल्याचे दिसून येत आहे.