लालपरीतील अग्निशमन यंत्रणा गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:17 AM2021-03-05T00:17:47+5:302021-03-05T00:17:57+5:30

पनवेल एसटी आगारातील प्रकार :  वायफाय केवळ नावालाच, महामंडळाने लक्ष देण्याची गरज

The red fire system disappears | लालपरीतील अग्निशमन यंत्रणा गायब 

लालपरीतील अग्निशमन यंत्रणा गायब 

Next



वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : अलीकडे राज्यात बसेसना आग लागल्याच्या घटना घडत आहेत. अशावेळी बसमधील अग्निशमन यंत्रणा निकामी झालेली असते किंवा अग्निशमन यंत्रणाच गायब झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर बसमधील चालक-वाहक तसेच प्रवाशांना नियंत्रण मिळविता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पनवेलमधील बस आगाराच्या अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या.
पनवेल बस आगाराची नव्याने निर्मिती केली जाणार आहे.  दररोज ३००० हजार पेक्षा जास्त बसेस विविध ठिकाणांहून आगारात ये-जा करीत असतात.  मात्र बसमधील अपुऱ्या सुविधा व अत्यावश्यक वेळेला उद‌्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रवाशांसाठी लाल परीत प्रवास असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. याकरिता महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नव्या बसेस सोडल्या तर बहुतांशी बसेसची दयनीय अवस्था आहे.

प्रथमोपचार पेट्या रिकाम्या
आगारात बहुतांशी बसमध्ये  केलेल्या तपासणीत प्रत्येक बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या आढळल्या. मात्र त्या  रिकाम्या असल्याने या प्रथमोपचार पेट्या केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक परिस्थितीत कोणाला प्राथमिक उपचार देण्याची वेळ आली तर बसमधील कर्मचाऱ्यांना हातावर हात धरून राहण्यापलीकडे काहीच करता येणार नसल्याचे  दिसून येत आहे.
बॉक्स गायब झाल्याचे चित्र 
एसटी महामंडळाने बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अनेक बसमधून वायफाय बॉक्स गायब झालेले आहेत. ज्या ठिकाणी हे बॉक्स उपलब्ध आहेत ते बंद अवस्थेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
बसमधील वायफाय सध्या बंद आहेत. मात्र ज्या बसमध्ये प्रथमोचार पेट्यांमधील साहित्य संपले आहे त्याची माहिती देण्याची सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. अशा प्रथमोपचार पेट्यात त्वरित साहित्य पुरविले जाईल. ज्या बसमधील अग्निशमन यंत्रणा सुरळीत नाही अशा बसची पाहणी केली जाईल.
- मोनिका वानखेडे 
आगारप्रमुख, 
पनवेल एसटी बस आगार

अडगळीच्या जागेचा अयोग्य वापर
nआगारात प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र अनेक वाहने सर्रास डेपोमध्ये पार्किंग केली जात आहेत.  विशेषतः आगारातील अडगळीच्या ठिकाणी काही बेजबाबदार नागरिक सर्रास लघुशंका करताना नजरेस पडतात. प्रवासी , फेरीवाले तसेच एसटी कर्मचारी मास्कचा योग्य वापर न करता आगारात वावरत असल्याचे दिसून येत आहेत.
nबसचालकांचे आसनच मोडकळीस आलेले संपूर्ण प्रवाशांचे स्टेअरिंग ज्या बसचालकाच्या हातात असते त्या बसचालकाचे आसनच मोडकळीस आलेले बसच्या पाहणीत पहावयास मिळाले. वर्षानुवर्षे अशा दुरवस्था झालेल्या आसनावर बसूनच चालक वाहन चालवत असल्याचे दिसून येत आहे. 
 

Web Title: The red fire system disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.