शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत प्रकल्पग्रस्तांची शंभर टक्के नोकर भरती करा, डीवायएफआयचा आंदोलनाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 16:51 IST

सिडकोमध्ये इंजिनिअर,क्लार्क त्याचप्रमाणे इतर पदांसाठी नोकर भरती होणार आहे.

- मधुकर ठाकूर 

उरण : सिडको महामंडळात प्रकल्पग्रस्तांचीच शंभर टक्के नोकर  भरती करा अशी मागणी डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन (डीवायएफआय) या युवक संघटनेने केली आहे. तसे न केल्यास स्थानिक भूमिपुत्र तरूण सिडको विरोधात आंदोलन करतील असा इशारा या संघटनेने दिला आहे. या संदर्भात सिडकोला मागणी पत्र देण्यात आले आहे.     सिडकोमध्ये इंजिनिअर,क्लार्क त्याचप्रमाणे इतर पदांसाठी नोकर भरती होणार आहे. त्यासाठीची सिडकोच्या विविध विभागात शेकडो पदे रिक्त आहेत.तर दुसरीकडे सिडकोमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावलून मागील दाराने नोकर भरती केली जात आहे. ती बंद करून सिडको महामंडळातील या रिक्त पदांची नोकर भरती सुरू करून या पदांवर नवी मुंबई प्रकल्पासाठी ज्या ठाणे(बेलापूर),पनवेल व उरणच्या ९५ गावातील स्थानिक भूमिपुत्रांमधूनच होण्याची आवश्यकता असताना मात्र अशा प्रकारची नोकरभरती यापूर्वी सिडकोने केलेली आहे. 

त्याचप्रमाणे राज्य सरकारने सिडको बाधीत प्रकल्पग्रस्त आणि इतर प्रकल्पग्रस्तांना एक समान न ठरवता यांच्यातील फरक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्याची ही मागणी करण्यात आली आहे. कारण येथील ९५ गावातील शेतकरी आणि त्यांचे वारस हे भूमीहीन आहेत. अशा प्रकारचा राज्यात आणि देशात कोणताही प्रकल्प नाही. त्यामुळे अपवाद म्हणून सिडकोच्या नोकर भरतीत नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचीच शंभर टक्के नोकर भरतीची तरतूद करण्याची मागणी डीवायएफआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश म्हात्रे यांनी केली आहे. तसे न केल्यास सिडको विरोधात भूमिपुत्र तरुण तीव्र आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी मागणी पत्रातुन दिला आहे. 

टॅग्स :cidcoसिडको