शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सात एकरमध्ये विक्रमी पीक; माले येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:17 IST

आपल्या शेतात अनेक प्रयोग करून यशस्वी शेती केल्याने त्यांना २०१३ साली कृषी विभागाकडून कृषिनिष्ठ प्रगत शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील माले येथील शेतकरी अरुण वेहेले यांनी आपल्या सात एकर शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. यावर्षी त्यांनी चार एकरमध्ये कोहळा, तर तीन एकरमध्ये डांगराची शेती करून विक्रमी पीक घेतले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणाºया शेतकऱ्यांमध्ये अरुण वेहेले हे नेहमीच आघाडीवर राहिले असून, कोहळा आणि डांगराच्या पिकातून मोठा नफा मिळाला आहे.माले गावातील अरुण वेहेले हे गेल्या २० वर्षांपासून शेती व्यवसाय करत आहेत. त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या शेतात अनेक प्रयोग करून यशस्वी शेती केल्याने त्यांना २०१३ साली कृषी विभागाकडून कृषिनिष्ठ प्रगत शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.

कृषी विभागातील अनेक योजनांचा ते लाभ घेत आहेत. त्यांनी शेतात अनेक प्रकारची भात पिके घेतली आहेत. त्यांनी केलेली शेती पाहून परिसरातील अनेक शेतकरी शेती विषयी माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असतात. भात शेतीनंतर ते उन्हाळ्यात आपल्या शेतात ठिबक सिंचन पद्धतीने काकडी, दुधी, टोमॅटो, चवळी, शिरोली, कारली, भेंडी, गवार अशी अनेक प्रकारची भाजीपाला पिके घेत आहेत. यासाठी त्यांना वार्षिक ६० ते ७० हजार रुपये खर्च येत असून, त्यापासून त्यांना एक ते दीड लाख रुपये नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या शेतात हापूस आंबा, केसरी, राजापुरी ही आंब्याची पिकेही घेतात.

यावर्षी त्यांनी आपल्या शेतात साळोख धरणाच्या पाण्यावर सात एकरमध्ये कमी खर्च येणारे पीक म्हणजे डांगर आणि कोहळ्याची लागवड केली आहे. यासाठी त्यांना २० हजार रुपयांचे बियाणे, २० हजार औषधे, १५ हजार खत, मजूर व इतर खर्च दहा हजार असा सुमारे ६० ते ६५ हजार रुपये खर्च आला आहे. पीक तयार झाले असून ते पूर्ण पीक कल्याण येथील बाजारपेठेत नेत असतात. कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात, त्यांना डांगर आणि कोहळ्यापासून आठ लाखांहून अधिक नफा झाला आहे.