शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

आरडीसीसी बँकेसह विकास संस्थांनाही पुढे नेणार - आमदार जयंत पाटील

By राजेश भोस्तेकर | Updated: September 27, 2023 16:31 IST

आरडीसीसी बँकेवर सहाव्यांदा आमदार जयंत पाटील चेअरमनपदी 

अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती होताना जिल्ह्यातील विकास कार्यकारी संस्थां आपण नफ्यात आणलेल्या आहेत. विकास संस्था स्वतच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना विविध व्यवसाय करता आले पाहिजे यादृष्टीने धोरण तयार केले आहे. संस्थानी स्वतः चा स्वनिधी उभारून त्यातून शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले पाहिजे. त्यांना लागणारी आर्थिक मदत, सबसिडी देण्याचा मानस नवीन संचालक मंडळाने केला आहे. तसेच जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीनाही हात देऊन धान्य, भाजी साठवणूक करण्यासाठी गोडवून उभारले जाणार असल्याचे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी मनोदय व्यक्त केला आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. बँकेवर इंडिया आघाडीचे सर्व २१ संचालक निवडून आले आहेत. बँकेच्या चेअरमन पदासाठी सहाव्यांदा आमदार जयंत पाटील यांची एकमुखाने निवड बुधवारी २७ सप्टेंबर रोजी करण्यात आली. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार जयंत पाटील यांनी चेअरमन पद स्वीकारले.  व्हॉईस चेअरमनपदी पुन्हा सुरेश खैरे यांनी निवड झाली. जिल्हा उपनिबंधक प्रशांत जगताप, सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील, रमेश नाईक, गिरीश तुळपुळे, जे एम म्हात्रे, सी ई ओ मंदार वर्तक, सर्व संचालक तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. निवडी नंतर आमदार जयंत पाटील यांनी बँकेच्या यशाबद्दल आणि भविष्यातील संकल्पना बाबत आपले मत व्यक्त केले. 

कर्नाळा, पेण बँकेच्या ठेवीदारांना पैसे मिळविण्यासाठी पुढाकारकर्नाळा बँकेचे चेअरमन यांनी पूर्ण मालमत्ता ही शासनाकडे दिली आहे. जी खातेदार, ठेवीदार यांच्यापेक्षा अधिक आहे. मालमत्ता घेण्याबाबत दोन तीन व्यक्ती पुढे आल्या आहेत. त्याबाबत मी पुढाकार घेत आहे. ज्याची पाच लाखावर डीपॉझिट आहे त्याचे पैसे आधी देणार आहोत. पावणे चारशे कोटींवर इन्शुरन्स आहे ते पैसेही देणार आहोत. त्यामुळे एक दोन महिन्यात कर्नाळा बँकेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पेण अर्बन बँक रिकवेशन मध्ये काढली तर इन्शुरन्सचे पैसे मिळतील. पेण अर्बन ची मालमत्ता ही अधिक आहे. आर डी सी सी बँकेकडे पेण अर्बन ची चारशे कोटीची मालमत्ता आहे. त्यामुळे पेण अर्बन बँकेचा ही प्रश्न मार्गी लागू शकतो. जिल्ह्यातील इतर बुडीत बँकांनी तारण घेतले नसल्याने अडचणीत आल्या. रायगड जिल्हा बँकेने कर्ज दिले आहे त्यापेक्षा दुप्पट पद्धतीने तारण मालमत्ता आमच्याकडे आहे. असे आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

शेती पिकाची काळजी घेण्याबाबत प्रयत्नसध्या बदलत्या वातावरणामुळे शेत पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेणे भविष्यासाठी गरजेचे झाले आहे. याबाबत कृषी आणि सहकार विभागाकडे मार्गदर्शन मागत आहोत. कायमस्वरूपी सोय झाली पाहिजे आणि शेतकऱ्याचे नुकसान थांबले पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. 

वडखळ येथे एक लाख स्केअर फुटाचे सेंट्रल गोडावून वडखळ येथे एक लाख स्केअर फुटाचे सेंट्रल गोडावून उभारण्यात आले आहे. हे भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न वाढवले जाणार आहे. यामध्ये बँकेशी सलग्न संस्था व्यवसाय करणार आहेत. यामध्ये लघु कर्ज संस्था, वीज बिल भरणा केंद्र सुरू केले जाऊन त्यातून संस्थांना टक्केवारी दिली जाणार आहे. जेणेकरून संस्थाचेही उत्पन्न वाढले जाणार आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्यवसाय ३५ कोटींवरून पाच हजार कोटींपर्यंत नेण्यात यशस्वी झालो. रायगड जिल्हा बँक देशातील सहकार क्षेत्रातील विविध उपक्रम यशस्वीपणे राबविणारी रोल मॉडेल बँक म्हणून लोकप्रिय आहे. देशातील पहिले केसीसी डेबीट कार्ड, अत्याधुनिक सेवा असणारी, विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे एकत्रीकरण तसेच संगणकीकरण पूर्ण करणारी बँक आहे. तीन वर्षात बँकेचा स्वनिधी ९ हजार कोटी करणार तर व्यवसाय १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याचा मानस आहे.- आमदार जयंत पाटील 

टॅग्स :Raigadरायगड