शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, जानेवारीचे रेशन मिळणार ना, दहा दिवसांपासून रेशन दुकानदार संपावर

By निखिल म्हात्रे | Updated: January 9, 2024 15:54 IST

जिल्ह्यातील ४ लाख ५७ हजार २०१ लाभार्थींना या महिन्यात रेशन मिळाले नाही तर खायचे काय, असा प्रश्न पडला आहे.

अलिबाग : एक जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांनी संप पुकारला असून आपली दुकाने बंद ठेवली आहेत. रायगड जिल्ह्यात डिसेंबरचे रेशन वाटप झाले आहे. मात्र या संपामुळे या महिन्यातील वाटपावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४ लाख ५७ हजार २०१ लाभार्थींना या महिन्यात रेशन मिळाले नाही तर खायचे काय, असा प्रश्न पडला आहे.

जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र फेडरेशन राज्य भाव धान्य संघटनेचे तालुका सचिव तथा राज्य संघटनेचे सहसचिव कौस्तुभ जोशी यांनी दिला आहे. रायगड जिल्ह्यातील १ हजार ४३० दुकानदार या संपात सहभागी आहेत. त्यामुळे अन्नधान्य वितरणावर याचा परिणाम होणार आहे.

पाठपुरावा करूनही केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप दुकानदारांकडून करण्यात येत आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच दुकानदारांच्या संपाचा फटका गोरगरिबांना बसला आहे.

काय आहेत मागण्या -

महागाईनुसार प्रतिक्विंटल कमिशन ३०० रुपये करावे

नवीन फोर-जी ई-पॉस मशीन लवकर द्यावे

ऑनलाईन सुधारित कार्यपद्धती विकसित करावी

धान्य वितरण मार्जिनची रक्कम दरमहा १० तारखेच्या आत द्यावी

डिसेंबरमधील धान्य वितरण पूर्ण

जिल्ह्यातील डिसेंबर महिन्यातील धान्य वितरण पूर्ण झाले आहे. मात्र, जानेवारी महिन्यातील वितरणावर संपाचा परिणाम होणार आहे. जिल्ह्यात पिवळी, केशरी आणि अंत्योदय अशा प्रकारातील ४ लाख ५७ हजार २०१ कार्डधारक असून, लोकसंख्या जवळपास १७ लाख ५३ हजार २०४ आहे. तर, अलिबाग तालुक्यात ४० हजार ९६५ कार्डधारक असून, एक लाख ६० हजार ९३४ लोकसंख्या आहे.

चार महिन्यांपासून मार्जिन प्रलंबित

मार्जिन २०१७ रोजी वाढवून १५० रुपये करण्यात आले आहे. त्याआधी ते ८० रुपये होते. मात्र, त्यानंतर सहा-सात वर्षे काहीच वाढ देण्यात आलेली नाही. कोरोना काळात आम्ही काम केलं, परंतु, मार्जिनव्यतिरिक्त कोणत्याही सुविधा शासनाने पुरविलेल्या नाहीत. रायगड जिल्ह्यात ऑगस्टपासून मार्जिन देण्यात आलेले नाही.अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी आम्हाला येत्या गुरुवारी बैठकीस निमंत्रण दिले आहे. संबंधित विभागाच्या मंत्रिमहोदयांशीसुद्धा याविषयी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यातून सकारात्मक तोडगा निघावा, अशीच आमची अपेक्षा आहे. - कौस्तुभ जोशी, सचिव, अलिबाग तालुका, रास्त भाव दुकानदार संघटनाकेंद्र आणि राज्याच्या अखत्यारीतील हा विषय आहे. राज्यस्तरावर याविषयी संघटनांच्या बैठका सुरू असून, यातून लवकरच मार्ग निघेल. - सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :alibaugअलिबागStrikeसंप