शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या पीरवाडी समुद्र किनाऱ्यावर अवतरल्या दुर्मिळ पाषाणातील देवदेवतांच्या मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 16:51 IST

पीरवाडच्या किनाऱ्यावर सध्या देवदेवता अवतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मधुकर ठाकूर

उरण - उरणच्या पीरवाडी बीचच्या समुद्रात अज्ञात लोकांनी टाकून दिलेल्या पुरातन पाषाणातील देवदेवतांच्या मूर्ती हौशी पर्यटकांनी पुन्हा किनाऱ्यावर आणून स्थापना केली आहे. त्यामुळे पीरवाडच्या किनाऱ्यावर सध्या देवदेवता अवतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उरणच्या द्रोणागिरी डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी अतिसंवेदनशील असा केंद्राच्या अखत्यारीतील ओएनजीसी प्रकल्प आहे. तर डोंगर माथ्यावर इतिहासाची साक्ष देणारा शिवकालीन ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. या ऐतिहासिक डोंगर परिसरात आदिवासींची वस्ती आहे. द्रोणागिरी डोंगरात भटकंती अथवा उत्खनन अथवा खोदकाम करताना पाषाणात कोरलेल्या देवीदेवतांच्या मूर्ती सापडतात. जंगलात अथवा खोदकामात सापडलेल्या देवीदेवतांच्या दुर्मिळ मूर्ती आदिवासी अथवा हौशी पर्यटक श्रध्देने आणून पीरवाडी बीचवरील समुद्र किनाऱ्यावर आणून ठेवतात. 

किनाऱ्यावर ठेवण्यात आलेल्या या पाषाणातील देवदेवतांच्या मूर्ती काही अज्ञातांनी समुद्रात टाकून दिल्या होत्या. मात्र समुद्राच्या ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर आढळून आल्यानंतर काही हौशी पर्यटकांनी देवीदेवतांच्या पाषाणी मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर आणून स्थापित केल्या असल्याची माहिती येथील व्यावसायिक दुकानदारांनी  दिली. त्यामुळे सध्यातरी पीरवाडी समुद्र किनाऱ्यावर देवीदेवता अवतरल्या असल्याचे चित्र आहे.

याबाबत पुरातत्व खात्याशी संपर्क साधला असता हे ठिकाण राज्य पुरातन विभागाच्या अखत्यारीत येत आहे.तरीही पाषाणी मूर्तीचे फोटो व व्हिडीओ पुरातन विभागाशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहेत. तज्ञांनीही प्रत्यक्ष पाषाणी मुर्त्याची पाहणी केल्यानंतरच याबाबत अभिप्राय नोंदविता येईल अशी माहिती मुंबई विभागीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :uran-acउरण