शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

समुद्रकिनार्‍यांवर रंगोत्सव, जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी; पर्यटकांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 10:46 IST

जिल्ह्यातील समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटकांनीही धूलिवंदनला एकमेकाला रंग लावून सण साजरा केला. या वेळी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सर्वच रंगीबेरंगी झाले होते. 

अलिबाग : रविवारी होळी पूजन झाल्यानंतर सोमवारी २५ मार्च रोजी सगळीकडे धूलिवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. रायगड जिल्ह्यात रंगाच्या रंगात प्रत्येकजण रंगून गेला होता. जिल्ह्यातील समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटकांनीही धूलिवंदनला एकमेकाला रंग लावून सण साजरा केला. या वेळी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सर्वच रंगीबेरंगी झाले होते. 

रविवारी २४ मार्च रोजी रात्री बारा वाजता होळीदहन केल्यानंतर रंग लावून धूलिवंदन सण सुरू झाला. सकाळी लवकर उठून बच्चे कंपनी ही एकमेकाला रंग लावून रंगीबेरंगी झाले होते. बच्चे कंपनीसह आबालवृद्धही या रंगाच्या सणात न्हाहून गेले होते. अनेकजण हे नैसर्गिक रंगांचा वापर करत होते. रायगड जिल्ह्यात धूलिवंदन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकही दाखल झाले होते. 

अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, नागाव समुद्रकिनारी तर धूलिवंदन खेळण्यासाठी आणि समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या वेळी एकमेकाला रंग लावून सणाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. रंगाची उधळण केल्यानंतर सर्वजण हे समुद्रात मौजमस्ती करण्यात दंग झाले होते. अनेक जण ग्रुपने शहरात फिरून एकमेकाला रंग लावत होते. त्यामुळे सगळीकडे रंगमय वातावरण निर्माण झाले होते. वरसोली समुद्रकिनारी स्थानिकसह पर्यटक यांनी रंगाची उधळण केली. वरसोली समुद्रकिनारा रंगाने न्हाहून गेला होता.

दक्षिण रायगडात १५ दिवस होळी    कोकणात गणपती आणि होळी या दोन सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. रायगडातही होळी सण तितक्याच पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो.     दक्षिण रायगडात होळीच्या माळरानावर १५ दिवस होळीचा सण साजरा होतो. समुद्रालगतच्या जिल्ह्यातील गावासह कोळीवाड्यात होळी उत्साहात साजरी होते.     सुपारी, आंबा, सावरच्या होळ्या सजविण्यात आल्या होत्या. पुरणाचीपोळी नैवेद्य दाखवून तिचे पूजन करण्यात आले होते.

७३ ठिकाणी मिरवणुकाजिल्ह्यात एकूण ३ हजार ९८५ होळ्या पेटवल्या. यात सार्वजनिक२ हजार ९१७, तर १ हजार ५९ खासगी होळ्या होत्या. ७३ ठिकाणी होळीच्या मिरवणुकाही काढण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Raigadरायगड