शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील ५० टक्के भात पेरण्या पूर्ण

By admin | Updated: June 21, 2016 01:31 IST

यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली

जयंत धुळप, अलिबागयंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. रायगड जिल्ह्यात पावसाला नेहमीपेक्षा उशीर झाला असला तरी प्रारंभाच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली असून, समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक नक्षत्र आणि पावसाच्या समन्वयाच्या अभ्यासानुसार सध्याचा पाऊस टिकणारा असल्याने शेतकऱ्यांनी भात पेरण्यांना जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ज्या ठिकाणच्या पेरण्या झाल्या, तेथे भाताची उगवण चांगली व दमदार झाली असल्याची माहिती शेतकरी महेश्वर देशमुख यांनी दिली आहे.रायगड जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ४१ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पीक लागवड होणार आहे. यापैकी १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भात, १० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नागली, १ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर तूर, १ हजार ९० हेक्टर क्षेत्रावर कडधान्ये तर ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर इतर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी.तरकसे यांनी केले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी एकूण १७ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी १५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यास पोहोच होवून त्यापैकी ७० टक्के बियाणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोच झाले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांस आवश्यक पीक कर्ज सत्वर उपलब्ध करुन देण्याकरिता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने विशेष नियोजन केले आहे तर त्याच सोबत राष्ट्रीय तसेच खासगी बँकांच्या माध्यमातून यंदा जिल्ह्यातील ३४ हजार १४५ शेतकऱ्यांना १८० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी सन २०१६-१६च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना १५८ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले होते.