शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

महाड, पोलादपूरमध्ये वादळासह गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:57 IST

महाड शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची हानी झाली, तर काही ठिकाणी झाडांची पडझड झाली.

महाड/पोलादपूूर : महाड शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची हानी झाली, तर काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. महाड औद्योगिक क्षेत्रातील काही ठिकाणी व टेमघर येथे वादळासह गारांचा पाऊस पडला. दुपारी ३ वाजता अचानक झालेल्या वादळात रायगड विभागात खर्डी, पाचाड आदी गावांतील घरांची छपरे उडून घरांची हानी झाली, तर काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत. औद्योगिक क्षैत्रात दोन ठिकाणी झाडे कोसळली आहेत.पोलादपूर शहरासह कशेडी, पळचिल विभाग अडावळे कामथे विभाग, लोहारे तुर्भे विभागासह आसपासच्या भागात कोसळलेल्या अवकाळी वादळी पावसाने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर काही झाडांच्या फांद्या तुटल्या. पावसामुळे गुरांचा चारा पावसाने भिजल्याने शेतकरी चिंतित झाला आहे.कशेडी परिसरातील पळचिल व आसपासच्या भागात गारांचा पाऊस कोसळला असून, या भागात लग्नकार्यासाठी उभारण्यात आलेले मंडप वादळामुळे कोलमडले. पोलादपूर ग्रामीण रुग्णालय, लोहारे परिसरात झाडे पडल्याची घटना घडली आहे. दीड तास कोसळणाऱ्या सोसाट्याच्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष पडले असले, तरी उशिरापर्यंत नुकसानाची माहिती हाती आली नाही. देवळे येथेही घराचे पत्रे उडून नुकसान झाल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊस