शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पावसाचा हाहाकार!; गाढी नदी परिसरातील रहिवासी वस्तीत शिरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 00:02 IST

शहरातील भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, टपाल नाका, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

पनवेल : मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गाढी नदीला पूर आल्याने पनवेल शहरातील नदीकाठी वसलेल्या वस्तीत पाणी शिरल्याने अनेक रहिवाशांना याचा फटका बसला. शनिवारी पनवेल तालुक्यात सुमारे २४०.२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.शहरातील भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, टपाल नाका, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. भारतनगर व कोळीवाडा या ठिकाणच्या घरात पाणी शिरले होते. शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पावसाच्या रुद्रावतारामुळे अनेकांनी घरातून बाहेर न पाडण्याचाच निर्णय घेतला.पनवेल शहरातील बंदर रोड परिसरात असलेल्या न्यायालयातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. जुना मुंबई-पुणे महामार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या मार्गावर ओएनजीसीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या ठिकाणी चार फुटापर्यंत पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडली होती. नवीन पनवेल बाँठिया शाळेजवळ, कळंबोली, कामोठे या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ग्रामीण भागात तळोजे मजकूर, आपटा कोळीवाडा, वावंजे गाव, पळस्पे-गणेशवाडी, फरशिपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.तालुक्यातील कासाडी, कर्णावती नद्यांनीदेखील धोक्याची पातळी ओलांडली होती. मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्थादेखील ठप्प झाली होती. पनवेल शहरात अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने रिक्षासेवा बंद झाली होती. प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत निश्चित स्थळी पोहोचावे लागले. हार्बर मार्गावरील पनवेल सीएसटी रेल्वेसेवादेखील अतिवृष्टीमुळे प्रभावित झाली होती. या मार्गावर रेल्वे उशिरा धावत होती. यामुळे पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.गाढी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने पालिका, तसेच तहसील प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला. सायन पनवेल महामार्गासह कळंबोली मुंब्रा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. रोहिंजन टोल नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.संरक्षण भिंत कोसळलीनवीन पनवेल सेक्टर १६ मधील एका सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर झाड कोसळल्याची घटना शनिवारी घडली. अतिवृष्टीमुळे झाड उन्मळून सोसायटीच्या संरक्षण भिंतीवर पडले. यामुळे संरक्षण भिंत कोसळली.आयुक्तांनी घेतली आपत्कालीन पथकाची भेटमागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिका मुख्यालयात सर्व अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींची बैठक घेतली. सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणांची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिली. पालिका क्षेत्रातील आपत्कालीन केंद्रात आवश्यक सामुग्री पुरविण्याचे आदेश दिले. अफवांना बळी न पडता आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन देशमुख यांनी दिले.

टॅग्स :panvelपनवेल