शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

पावसाचा जोर कायम;रोह्यात कुंडलिकेने गाठली इशारा पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:15 IST

अलिबाग : विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी चांगलाच दणका दिला, त्यामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे, तर भिरा धरणाचे ...

अलिबाग : विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी चांगलाच दणका दिला, त्यामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे, तर भिरा धरणाचे दोन दरवाजे उघडावे लागले आहेत. सातत्याने अशा पडणाऱ्या पावसाने नदीकाठी राहणारे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस पावसाचा असाच जोर राहणार असल्याने अलर्ट जारी केला आहे.

बुधवारी सकाळपासून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शेतीची कामे मात्र खोळंबली आहेत. सकाळी सोसाट्याच्या वाºयासह पाऊस पडत असल्याने काही शाळांनी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजीचे वर्ग बंद ठेवले होते. ११ व १२ जुलै रोजीही रायगड जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाºयासह पर्जन्यवृष्टी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पर्यटनस्थळे, धबधबा, गड-किल्ले येथे जाताना काळजी घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.रायगड जिल्ह्यात आतापर्यंत १२८५.०४ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. बुधवारी दिवसभर पावसाने झोडपल्याने शेतीची कामे खोळंबली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर मजुरी पडल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस रात्रभर सुरूच राहिल्यास सावित्री, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्या धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, रोह्याच्या कुंडलिका नदीनेही इशारा व धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत तीन वेळा ओलांडली आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य कक्षाने पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा प्रशासनाला दिला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रोह्यात गेले तीन दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसाने बुधवारीही हैदोस घातला. शहरातील मुख्य हमरस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेले, कुंडलिका नदीवरील कोलाड येथील डोलवहाळ बंधाºयाने २३ मि.मी. ही इशारा पाणीपातळी गाठल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. नदीने रौद्ररूप धारण केले असून दुपारपासून रोहा-अष्टमी दरम्यान असलेल्या पुलाला लागून पाणी वाहू लागल्याने भीती व्यक्त होत आहे. सायंकाळपर्यंत पावसाची स्थिती अशीच राहिल्यास पाणी वाढण्याची शक्यता आहे.

धरणातून पाणी सोडले गेल्यास त्याचा फटका नदीच्या दोन्ही बाजूकडील रोहा-अष्टमी शहर आणि लगतच्या गावांना बसणार आहे. त्याचप्रमाणे येथील धाटाव एमआयडीसीत कामासाठी मोठ्या संख्येने येणाºया कामगारांनाही बसणार आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाण्याची वाढत असलेली पातळी लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून नदीकिनारी असणाºया गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.