शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; भातपिकाला बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:06 IST

अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ

अलिबाग : मंगळवारी दुपारी जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. कुठेही अतिवृष्टी व जीवितहानी झाली नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र,या  पावसाने तयार झालेल्या  भातपिकाला जिल्ह्यातील काही भागांमध्ये थोड्या प्रमाणात फटका बसला आहे. 

भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेषत: किनारपट्टीलगतच्या सर्व तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. बुधवारी दिवसभर अंधूकसे वातावरण कायम राहिले होते.

अचानक पडणाऱ्या  या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. 

पनवेल परिसरात पावसाची दमदार हजेरी 

कळंबोली : पनवेल परिसरात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. कामोठे, कळंबोली, पनवेल परिसरात सखल भागांत पाणी साचले होते. सायन-पनवेल महामार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती.  पनवेल परिसरात साडेपाचच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. कळंबोली येथील करवली नाका, सेक्टर १४, एलआयजी भागात पाणी साचले होते. पनवेल ओरियन मॉलसमोर रस्त्यावर दीड फूट पाणी साचले होते. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे परिसरातील  वसाहतीत पाणी साचले होते. त्याचबरोबर सायन-पनवेल महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. कळंबोली सर्कल येथे वाहतूककोंडी झाली होती. कामोठे सेक्टर ६ ए येथे महानगर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसाबरोबर सोसाट्याचा वारा  सुटल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. पावसाने तासभर पनवेल परिसरात दमदार बॅटिंग केल्याने सखल भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते.

 

टॅग्स :Rainपाऊस