शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात पहाटेपासून धो-धो पाऊस, आंबेनळी घाटातून संथ गतीने वाहतूक सुरू

By राजेश भोस्तेकर | Updated: June 28, 2023 08:20 IST

जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाने जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात बुधवारी पहाटे पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. ढगांचा गडगडाटसह मुसळधार पाऊस पडत आहे. आंबेनळी घाटात रात्री रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यामुळे दोन्ही कडची वाहतूक ठप्प झाली होती. रिस्क्यू पथकाने दरडीचा काही भाग काढला असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू झाली. मात्र, यानंतर आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाने जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याला ३० जून पर्यंत ओरेज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पहाटे पासून  सुरू झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे.समुद्र, नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. दरड ग्रस्त भागातील नागरिकांनाही परिस्थिती पाहून नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.

मुसळधार पावसाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहाटे पासून सुरू झालेल्या पावसाने महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. अलिबाग तालुक्यातील सागव फिडरवरील ग्राहकांना मध्यरात्री पासून अंधारात रात्र काढावी लागली आहे. जिल्ह्यातही अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंट जवळ दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हेणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा. - सोमनाथ घार्गे (पोलीस अधिक्षक, रायगड)

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस