शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या निवडणूक यंत्रणेचे सुकाणू रणरागिणींच्या हाती!

By निखिल म्हात्रे | Updated: April 7, 2024 18:11 IST

- महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसह प्रशासनात ६५ टक्के महिला कार्यरत

अलिबाग: मतदारांची वाढलेली संख्या, दीड महिना आधीपासूनच प्रचाराला आलेली रंगत आदी वैशिष्ट्ये यंदा रायगड लोकसभा मतदारसंघात असतानाच निवडणूक यंत्रणा सांभाळणाऱ्या यंत्रणेत तब्बल ६५ टक्के महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत, हे आणखी एक मोठे वैशिष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या नेतृत्वाखाली या महिला त्यांचे निवडणुकीचे काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहेत.

निवडणुकीच्या कामकाजात रायगडच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडीयार, रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनीषा विखे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला आहिरराव या तर मुख्य भूमिका सांभाळत आहेत.निवडणूक यंत्रणेत अत्यंत महत्त्वाचा असा विषय म्हणजे प्रशिक्षण. पण, या कामाची जबाबदारी रायगड जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्षा अप्पर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार या अत्यंत प्रभावीपणे सांभाळत आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचे अखेरच्या क्षणापर्यंत अद्ययावतीकरण, निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ततेकरिता आवश्यक निविदा प्रक्रिया, याबरोबरच मतदान यंत्रे याबरोबरच एकूणच निवडणूकविषयक सर्व कामकाजाचे समन्वय आदी अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या रायगडच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे या सांभाळत आहेत.

जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांचे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अचूक व अधिकृत माहिती देण्याबरोबरच माध्यम प्रमाणीकरण समितीच्या सदस्य सचिव आहेत. उमेदवार प्रचार साहित्याला परवानगी देणे, पेड न्यूज तपासणे तसेच मीडियाला आवश्यक माहिती पुरविणे हे काम त्या प्रभावीपणे सांभाळत आहेत. तर मतदान केंद्रासह निवडणूक निकालादरम्यान लागणारी आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम डॉ. मनीषा विखे करीत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्यावर मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आदिवासी नागरिकांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीची जबाबदारी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला आहिरराव यांच्यावर दिली आहे. त्यांचे पथक आदिवासी वाड्यांवर जाऊन मतदानाची जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. तर, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव या विद्यार्थ्यांमार्फत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. रायगड जिल्ह्याचा खासदार ठरविण्यात जसा महिलांचा प्रमुख वाटा आहे तसेच निवडणूक कामकाजात देखील महिला अधिकारी व कर्मचारी यांची मोठी संख्या आहे. ही संख्या तब्बल ६५ टक्के आहे.

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागElectionनिवडणूक