शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

रायगडकर तापाने फणफणले

By admin | Updated: November 7, 2015 00:55 IST

रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर सर्दी, खोकला आणि तापाची साथ सुरू आहे. चार हजार ५८७ रुग्ण या आजाराने त्रस्त झाले आहेत. ही आकडेवारी सरकारी रुग्णालयातील

- आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर सर्दी, खोकला आणि तापाची साथ सुरू आहे. चार हजार ५८७ रुग्ण या आजाराने त्रस्त झाले आहेत. ही आकडेवारी सरकारी रुग्णालयातील असून खाजगी रुग्णालयातील आकडेवारीचा विचार करता तो आकडा जास्त असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वातावरणात झालेल्या बदलाचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसला असून त्यांचे प्रमाण हे सुमारे ६० टक्के आहे.आॅक्टोबर हीटचा तडाखा हा नोव्हेंबर महिन्यातही जाणवत आहे. दुपारी कडक उन्ह तर, सकाळी आणि सायंकाळी वातावरण थंड असल्याने वातावरणातील जीवाणू सक्रिय झाले आहेत. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना याचा तातडीने त्रास होत आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांना सर्दी, खोकला आणि तापाच्या आजाराने घेरले असल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. १८ ते २५ आॅक्टोबर २०१५ या आठवड्यात दोन हजार २१९ रुग्ण आढळले आहेत. तीन आठवड्यांपेक्षा कमी खोकला असणाऱ्यांची संख्या ५२४ होती, तर तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असणाऱ्यांची संख्या ही ७० होती. एक हजार ७४ रुग्णांना जुलाबाचा त्रास होत आहे.२६ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत तापाने फणफणाऱ्यांची संख्या ही दोन हजार ३६८ होती. सात दिवसांपेक्षा जास्त ताप असणाऱ्यांची संख्या ही ५३ होती. तीन आठवड्यांपेक्षा कमी खोकला असणाऱ्यांची संख्या ही ५८६ होती, तर तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असणाऱ्यांची संख्या ही ५० होती. एक हजार १२५ रुग्णांना जुलाबाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे. कारण ही आकडेवारी फक्त सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील आहे. वातावरण बदलत आहे. त्यामुळे जीवाणूंसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्याचा फटका लहान मुलांना बसत आहे. खोकला आणि ताप लवकर बरा होत नसल्याने घाबरुन जाऊ नका. लहान मुलांना दिवसातून चार-पाच वेळा गरम पाणी पाजल्याने जीवाणूंना मारण्यास मदत होईल.-डॉ. विनायक पाटील, बाल रोगतज्ज्ञ