शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रायगडाला गतवैभव परत मिळवून देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 04:24 IST

राजधानीवर जाऊन केली गड संवर्धनाच्या कामांची पाहणी

किल्ले रायगड/ दासगाव : स्वराजाच्या राजधानीचे जतन करून हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक वर्षांत दुरुस्ती न झाल्याने स्वराज्याच्या राजधानीतील बऱ्याच ऐतिहासिक वास्तूंची पडझड झाली होती. मात्र, भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणामार्फत राजधानीला तिचे गतवैभव परत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रविवारी मुख्यमंत्र्यांनी किल्ले रायगडावर जाऊन तेथे सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, रघुजीराजे आंग्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, भारतीय पुरातत्त्व विभागाचे मुंबई निर्देशक बिपिनचंद्र नेगी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, रायगड किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन हे इतिहासाशी संधान साधून केले जात आहे. किल्ल्याच्या परिसरात पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे. त्याशिवाय शिवसृष्टीसाठी लागणाºया २० एकर जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. गडावरील २२ तलावांमधील गाळ काढणे व गळती दुरुस्त करण्याचे काम केल्याने सध्या मुबलक पाण्याची उपलब्धता आहे, अशी माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात ५९ कोटींची संवर्धन कामे पूर्णत्वाकडेछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून गेले वर्षभर संवर्धन आणि रायगड परिसर विकासाचे काम शासनाने हाती घेतले आहे. याकरिता शासनाने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात ५९ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. रायगडावरील नष्ट होत असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन, चित दरवाजा ते हत्ती तलाव पायरीमार्ग दुरुस्ती, वीज व्यवस्था, गडावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, उत्खनन करून जुन्या वस्तू प्रकाशात आणणे या संवर्धनाच्या कामासह रायगड परिसरातील गावातील सुविधा, तेथील रस्ते, पाणी व्यवस्था आदी कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaigadरायगड