शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: पर्यटनासह पर्यटकांनी घेतला समुद्र सफारीचा आनंद

By निखिल म्हात्रे | Updated: May 19, 2024 21:59 IST

Raigad News: उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पुणे-मुंबईसह राज्यभरातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले आहेत. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

- निखिल म्हात्रेअलिबाग - उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पुणे-मुंबईसह राज्यभरातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले आहेत. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी पाण्यात पोहोचण्याचा आनंद पर्यटक अधिक घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे तसेच येथील मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्रे पर्यटकांच्या कायमच पसंतीस उतरली आहेत. यंदा देखील पर्यटकांनी उन्हाळी सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी जिल्ह्याला पसंती दिली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी पडली आहे. त्यात शनिवार व रविवार साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यासह इतर राज्य, देश-विदेशातील पर्यटक जिल्ह्यात येऊ लागले आहेत. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने काही पर्यटक शुक्रवारी सायंकाळी, तर काही पर्यटक शनिवारी सकाळी जिल्ह्यात आले. अलिबागसह नागाव, वरसोली, काशीद, मुरूडसारख्या अनेक समुद्रकिनाऱ्यांमध्ये जाऊन पाण्यात पोहण्याचा आनंद त्यांनी लुटला. काही पर्यटक बनाना राईड्स, तर काही पर्यटकांनी बोटींमधून प्रवास करीत समुद्र सफरीचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी समुद्रकिनारी असलेले सायकल, उंटावरील सवारी घेत मौजमजा केली. काही जण आपल्या मित्रांसमवेत, तर काही कुटुंबियांसमवेत समुद्रकिनारी फिरण्यास आल्याचे दिसून आले. यामध्ये तरुण पर्यटकांचा अधिक उत्साह असल्याचे दिसून आले. यामुळे पर्यटनावरुन अवलंबून असलेले हॉटेल व लॉज व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या खूप चलती आहे. स्थानिकांना रोजगार पर्यटक जिल्ह्यात दाखल झाल्याने स्थानिक व्यवसायिकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांना यातून उभारी मिळत आहे. सध्या उष्णता जाणवत आहे. यातून सुटका घेण्यासाठी काही पर्यटकांनी नारळ पाणी पिण्यावर अधिक भर दिला.

बाप्पाच्या दारी भक्तांची मांदियाळी अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे, खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर. सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याचे दिसून येत आहे.

जंजिरा, कुलाबा किल्ल्याला भेट मुरुड आणि अलिबाग समुद्र किनाऱ्याची मजा लुटतानाच पर्यटक येथे असलेल्या मुरुड जंजिरा आणि कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत. तिथला इतिहास जाणून घेत आहेत. ओहोटीच्या वेळी कुलाबा किल्ल्यावर चालत किंवा घोडागाडीने जाता येते. तर, जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी फेरीबोटींच्या फेन्या सुरु असतात. किल्ल्याची माहिती देण्यासाठी याठिकाणी गाईडसुद्धा उपलब्ध आहेत.

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन