शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रायगडमध्ये खबरदारी घेतल्यानेच यंत्रणा सुदृढ; कोरोना वॉरियर्सचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:04 IST

पोलीस, आरोग्य, महसूल विभागात शिरकाव नाही

- आविष्कार देसार्ई अलिबाग : आरोग्य, पोलीस आणि महसूल प्रशासन अगदी फ्रंटवर उभे राहून कोरोनाचा मुकाबला करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते कोरोना विरोधातील लढाई लढत आहेत. मात्र या यंत्रणेतील योद्ध्यांना कोरोनाने मोठ्या संख्येने टार्गेट केलेले नाही. अपवाद फक्त महाड सरकारी रुग्णालयातील एका परिचारिकेचा आहे. सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेतल्यानेच कोरोना वॉरियर्स कोरोनापासून बचाव करण्यात यशस्वी ठरले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी हे आपला जिल्हा कोरोनापासून सुरक्षित राहावा यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा थेट संबंध हा कोरोनाबाधित रुग्णांशी येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांनासुद्धा अद्याप कोरोनाने शिवलेलेदेखील नाही.

रायगड जिल्ह्यातील चेकपोस्टवरुन अद्यापर्यंत अडीच लाख चाकरमानी नागरिक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९०० हून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत, तर ३७ रुग्ण कोरोनाविरोधातील लढाई हरले आहेत. मृत पावलेले रुग्ण हे अन्य कोणत्या आजाराने त्रस्त असल्याने सहजपणे कोरोनाच्या मगरमिठीत अडकले.

ग्रामीण भागांमध्येदेखील आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी हेदेखील बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करताना त्यांच्या संपर्कात आले आहेत. मात्र त्यांनी योग्य ती खबरदारी घेतल्यानेच त्यांना कोरोनाची बाधा पोहोचलेली नाही. जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हेदेखील कोरोनाविरोधातील लढाईत मागे राहिलेले नाहीत. त्यांनाही अद्याप कोरोना झाल्याचे आढळले नाही.

सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे - निधी चौधरी

कोरोनाविरोधातील लढाई लढताना सेनाप्रमुख आणि सैन्य सक्षम असणे महत्त्वाचे आहे. हाच धागा पकडून रायगड जिल्ह्यात कोरोनाविरोधातील लढाई प्रशासकीय यंत्रणा लढताना दिसून येते. सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे याबाबत सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याने तशा सूचना यंत्रणांना देण्यात आल्या होत्या, असे जिल्हाधिरी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.कोरोनाचा मुकाबला करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, त्याचबरोबर ती सरकार आणि प्रशासनाचीही आहे. नागरिकांची काळजी घेताना पोलीस, आरोग्य आणि महसूल, जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यामुळे जनतेची काळजी घेताना प्रथम आपली काळजी घेण्याबाबत आधीपासूनच सूचना देण्यात आल्या होत्या. लवकरच या संकटातून आपण बाहेर पडू.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस