शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन, जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित

By निखिल म्हात्रे | Updated: April 25, 2024 13:14 IST

Raigad News: रायगड जिल्ह्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन झाले आहे. मच्छीमारांना मासेमारी करताना हा जीव जाळ्यात सापडला होता. त्यांनी त्याला पुन्हा खाडीत सोडले. यानिमित्ताने काळिंजेच्या खाडीचे जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

- निखिल म्हात्रेअलिबाग - रायगड जिल्ह्यातील काळिंजेच्या खाडीत दुर्मीळ समुद्री घोड्याचे दर्शन झाले आहे. मच्छीमारांना मासेमारी करताना हा जीव जाळ्यात सापडला होता. त्यांनी त्याला पुन्हा खाडीत सोडले. यानिमित्ताने काळिंजेच्या खाडीचे जैविक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

श्रीवर्धन तालुक्यापासून १३ किमी अंतरावरील काळिंजे गावामध्ये १९० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरले आहे. याठिकाणी खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती कांदळवनांचे दाट आच्छादन आहे. या बेटावरच वालुकामय चिखलाच्या मैदानाचा एक मोठा भाग पसरलेला आहे. काळिंजे गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी. मंगळवारी (दि. २३) सकाळी १० वाजता काळिंजे येथील मच्छीमार अनिस फणसोपकर खाडीत मासेमारी करत असताना त्यांना जाळ्यात समुद्री घोडा आढळला.

खाडीत कोळंबी पकडण्यासाठी पाग टाकलेला असताना, त्या जाळ्यात नारंगी रंगाचा समुद्री घोडा आढळल्याची माहिती फणसोपकर यांनी दिली. त्यांनी लागलीच या समुद्री घोड्याला जाळ्याबाहेर काढले आणि याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानाचे सहायक संशोधक मोहन उपाध्ये यांना दिली. त्यांनी या समुद्री घोड्याची पाहणी करून फणसोपकर आणि विक्रांत गोगरकर यांच्या मदतीने पुन्हा त्याला खाडीत सोडले. या समुद्री घोड्याची लांबी १३ सेमी होती. समुद्री घोडा हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असून, त्याला वाघाएवढे संरक्षण देण्यात आले आहे.

खाडीत कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटनकाळिंजे खाडीत कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन सुरू आहे. गावातील स्थानिक लोक कांदळवन कक्षाच्या मदतीने निसर्ग पर्यटन करत आहेत. या खाडीत कांदळवनांच्या ११ प्रजाती आढळत असून, पक्ष्यांच्या सुमारे ८० हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. तसेच पाणमांजरांचा अधिवास या परिसरात पाहावयास मिळतो. महत्त्वाचे म्हणजे चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटाच्या मध्यभागी गोड्या पाण्याच्या विहिरी असून, तिथे कोल्हे व रानडुकरांचे अस्तित्व आहे. त्यामुळे येथील जैवविविधता लक्षात घेऊनच निसर्ग पर्यटनाला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड