शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Raigad: रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत

By निखिल म्हात्रे | Updated: May 10, 2024 12:45 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रिडा संकुल नेहुली, अलिबाग या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉग रुममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत.

- निखिल म्हात्रेअलिबाग - रायगड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रिडा संकुल नेहुली, अलिबाग या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉग रुममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत.स्ट्रॉग रुमच्या सुरक्षेकरिता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण बंदोबस्त व्यवस्थेचे प्रभारी अधिकारी म्हणून श्री.विनीत चौधरी, उप-विभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग यांना नियुक्त करण्यात आले आहे.

यामध्ये पहिल्या स्तरामध्ये केंद्रिय सशस्त्र दल CRPF 113 बटालीयन G कंपनी चे एक प्लाटून नेमण्यात आले आहे. या प्लाटूनमधील सशस्त्र जवान हे स्ट्रॉग रुमच्या जवळच्या सर्वात आतील कॉर्डन 1 मध्ये असतील व त्यांची स्ट्रॉग रुम वर 24 तास नजर असेल. तसेच स्ट्रॉग रुममध्ये लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही.चे कंट्रोल रुम यांच्या ताब्यात असेल. दुस-या स्तरामध्ये राज्य सशस्त्र दल SRPF ग्रुप 8, मुंबई येथील एक प्लाटून नेमण्यात आले आहे. या प्लाटूनमधील सशस्त्र जवान हे स्ट्रॉग रुमच्या जवळच्या कॉर्डन 2 मध्ये असतील व त्यांची कॉर्डन - 1 च्या बाहेरील परिसरामध्ये 24 तास पेट्रोलिंग असेल तसेच यातील वॉच टॉवरवर तैनात जवान आजुबाजूच्या परिसरावर नजर ठेवून असतील.तिस-या स्तरामध्ये रायगड पोलीस दलातील 6 अधिकारी व 40 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये सशत्र अंमलदारांचाही समावेश असेल. हे अंमलदार स्ट्रॉग रुमच्या जवळच्या कॉर्डन - 3 मध्ये असतील व त्यांची कॉर्डन 2 च्या बाहेरील परिसरात तसेच जिल्हा क्रिडा- संकूलाच्या आजुबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये 24 तास गस्त असेल. जिल्हा क्रिडा संकुलामध्ये प्रवेश करण्या-या प्रत्येक वाहनाची तसेच प्रत्येक व्यक्तीची मुख्य प्रवेशद्वाराजवळ तपासणी केली जाईल व केवळ अधिकृत व्यक्ती व वाहनांनाच प्रवेश दिला जाईल.

जिल्हा क्रिडा संकुलाच्या परिसरामध्ये सी.सी.टी.व्ही. बसवण्यात आले असून त्याद्वारेही परिसरात नजर ठेवली जाणार आहे. संपूर्ण बंदोबस्तामध्ये बंदोबस्तामधील जवानांमध्ये आपसात समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेशवहन/दळणवळनाची सुविधा असून त्याद्वारे रायगड पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाचे अधिकारी संपूर्ण बंदोबस्तावर लक्ष ठेवून असणार आहेत.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४maval-pcमावळElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४