शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

रायगड जिल्ह्यातील प्रश्नाबाबत झाली गंभीर चर्चा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाल्या  बैठका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 21:05 IST

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विविध बैठका पार पडल्या.

- जयंत धुळप  अलिबाग  - अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विविध बैठका पार पडल्या. यात रायगड जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांचा आढावा त्यांनी घेतला. विविध विषयांवर झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, स्थानिक लोकप्रतिनिधी व संबधित विभागांचे अधिकारी उपस्थ‍ित होते.

रायगड येथे रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात तफावत असल्याप्रकरणी पेण प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे, तसेच रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी तालुक्यातील काही  शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात असलेली तफावत दूर करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी त्यांनी पाठवलेले प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, असे निर्देश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. 

रायगड येथील पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या पैशातून घेतलेल्या जमिनीच्या प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प, भारत सरकारच्या चॅम्पियन सर्व्हिस सेक्टरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी घेण्यात येणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प, स्वदेश दर्शन या विषयांवर सिंधुदुर्ग जिल्हा जल पर्यटन विकास कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. 

टॅग्स :Raigadरायगड