शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: करंजा येथे पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 17:32 IST

Raigad: उरण तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला.

- मधुकर ठाकूरउरण -  उरण तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यांनीही सालाबाद प्रमाणे आपला पारंपारीक सण साजरा केला.त्यात त्यांनी प्रतिकात्मक सोनेरी नारळ तयार केला होता.या प्रथेप्रमाणे सोन्याच्या नारळाची पूजा करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांच्या हस्ते पार पडली.

 त्यानंतर सजविलेल्या गाडीमध्ये तो नारळ मिरवणूकीने वाजतगाजत समुद्रकिनारी नेण्यात आला. तिथे पूजा करुन होडीने खोल समुद्रात नेऊन अर्पण केला.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारीक कोळ्याचा पोषाख परिधान केला होता.तसेच समुद्र किनारी तयार केलेल्या स्टेजवर विद्यार्थ्यांनी कोळी नृत्यही सादर केली.काळाप्रमाणे या सणामध्येही जुन्या कोळीगीतांसह आधुनिक गीतांचेही स्वर गुंजले. पारंपारिक वाद्यांच्या जागी डॉल्बी सिस्टीमने घेतलीय.पद्धती बदलत चालल्यात. पण उत्साहाची कुठेच कमतरता भासली नाही.खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी करंजा येथील विद्यार्थीनीही श्रीफळ अर्पण केला. ही बाब निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा पुढे चालण्यासाठी आशादायी आहे.नारळी पोर्णिमेच्या या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले  होते.

टॅग्स :Raigadरायगड