शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगड : पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील साडेचार हजार गुंतवणुकदारांना घातला पावणेपाच कोटींचा गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 22:50 IST

रायगड : जिल्ह्यातील तब्बल 4 हजार 340 गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून गंडा घालून तब्बल एकूण पावणोपाच कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी, ठाणे जिल्ह्यातील विरार येथील रहिवासी भुपेंद्र चंद्रकांत मालवणकर यास रायगड पोलीसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेशण शाखेने मोठय़ा शिताफीने अटक केले आहे.

ठळक मुद्देभुपेंद्र मालवणकर गजाआडसात दिवसांची पोलीस कोठडी

जयंत धुळपलोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यातील तब्बल 4 हजार 340 गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून गंडा घालून तब्बल एकूण पावणोपाच कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी, ठाणे जिल्ह्यातील विरार येथील रहिवासी भुपेंद्र चंद्रकांत मालवणकर यास रायगड पोलीसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेशण शाखेने मोठय़ा शिताफीने अटक केले आहे. शुक्रवारी मालवणकर यास येथील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेशण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. 

दामदुप्पट रक्कम मिळणार असल्याची जाहिरातमालवणकर याने सन 2०12 मध्ये अलिबाग तालुक्यात ओमसाई प्रोडक्ट सेल नावाची संस्था उभारली. या संस्थेमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम मिळणार असल्याची जाहिरात केली. तसेच वेगवेगळ्या योजना राबवित अनेकांना त्याने योजनेच्या जाळ्यात ओढले होते. त्यासाठी ठिकठिकाणी त्याचे प्रतिनिधी कार्यरत होते. अल्प कालावधीत अधीक परतावा मिळणार असल्याने या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी पैशांची गुंतवणूक करण्यास सुरु वात केली. गेल्या चार-पाच वर्षात नागरिकांचा विश्वास संपादन करुन 4 हजार 34० नागरिकांकडून त्यांच्या पैशांची गुंतवणूक या योजनेत करुन घेतली.

गुंतवणुकदारांना रक्कम परत देण्यास टाळाटाळजानेवारी 2०17 मध्ये ज्या गुंतवणूकदारांची गुतवणूक मूदत पूर्ण झाली त्यांनी परतावा मागण्यास प्रारंभ केला असता, गुंतवणुकदारांना रक्कम परत देण्यास टाळाटाळ करण्यास प्रारंभ झाला. आणि मालवणकर याच्याकडून गुतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. नोटबंदीचा फटका बसला असल्याचे सांगून तो वारंवार गुंतवणुकदारांना टाळण्याचा प्रयत्न करीत होता.

गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्नदरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर एका महिलेने याप्रकरणी जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्र ार केली. या तक्र ारीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे व पोलीस हवालदार वैभव सायगावकर या पथकाने तपास सुरू केला. चौकशीमध्ये भुपेंद्र मालवणकर याने गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी भूपेंद्र मालणवकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून बुधवारी दुपारी अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने  सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडCrimeगुन्हा