शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी

By निखिल म्हात्रे | Updated: May 3, 2024 11:27 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बँक कर्मचारी घेण्यात आले आहेत.

अलिबाग : जिल्ह्यातील रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या गृह मतदानासाठी राष्ट्रीयीकृत बँक आणि केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या कंपन्यांचे कर्मचारी मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून काम पाहत आहेत. सात विधानसभा मतदारसंघांत १०९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांमुळे बँकांचे कामकाजावर परिणाम झालेला नसल्याचे जिल्हा अग्रणी बँकेतर्फे सांगण्यात आले.

रायगड जिल्ह्यातील रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी, तर मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषद, इतर शासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रावरील मतदान कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तर राष्ट्रीयीकृत बँक व जेएनपीटी, ओएनजीसी, आरसीएफ, गेल, एलआयसी आदी कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे देण्यात आली आहेत. गृह मतदान आणि सुविधा केंद्रांवर मायक्रो ऑब्जर्व्हर म्हणून हे कर्मचारी काम करणार आहेत.

१०९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवडरायगड लोकसभा मतदारसंघात ३० एप्रिलपासून गृह मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून, ती ४ मेपर्यंत चालणार आहे. यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघात ८, कर्जत ४, उरण ८, पेण २४, अलिबाग २७, श्रीवर्धन २१ आणि महाड १८, असे एकूण १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हे कर्मचारी फक्त गृह मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत, तसेच संवदेनशील मतदान केंद्रांवर ३२ मायक्रो ऑब्जर्व्हर्सना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बँक कर्मचारी घेण्यात आले आहेत. बँक शाखांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी शाखांमध्ये आवश्यक तो कर्मचारी वर्ग ठेवण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे. कर्मचारी वर्ग कमी झाल्याने बँकेच्या व्यवहारांवर परिणाम झाल्याची तक्रार आपल्याकडे आलेली नाही. - विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, रायगड

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी घेण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांकडे मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून काम असणार आहे.- स्नेहा उबाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान