शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: जनतेला दिलेला कौल मान्य- अनंत गीते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 15:02 IST

शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.

रायगडः शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जनतेने दिलेला कौल मी मान्य केला आहे. पराभव कुणामुळे झाला त्याचे विश्लेषण मी करणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रायगडचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली आहे. रत्नागिरीतून चार वेळा तर रायगडमधून दोन वेळा असे कोकणातून सहा वेळा खासदार झालेल्या गीतेंचा पराभव याचा मोठा धक्का सेनेला बसला आहे. राज्यभरात शिवसेना-भाजपा युती जोरदार मुसंडी मारली असताना रायगडमध्ये मात्र युतीला धक्का बसला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे 21 हजार मतांनी निवडून आले आहेत. तटकरेंनी केंद्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांना पराभवाचा धक्का दिला.  रायगड लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये अखेरपर्यंत अटीतटीची झुंज सुरू होती. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये सुनील तटकरे यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र मतमोजणीच्या मध्यावर तटकरे यांनी घेतलेली आघाडी मोडून काढत अनंत गीते यांनी आघाडी घेतली होती. मात्र दोन्ही नेत्यांना मिळालेल्या मतांमध्ये फारसे अंतर नसल्याने या मतदारसंघात टफफाईट सुरू होती. अखेरीस सुनील तटकरे यांनी  सुनील तटकरे यांनी 21 हजार मतांनी विजय मिळवला. गेल्या दोन तीन दशकात अपवाद वगळता कोकणात शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघामध्येही गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे निवडून आले  होते. 

टॅग्स :raigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीते