शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Raigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे?; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 10:55 IST

दुर्घटनाग्रस्त तळीये ग्रामस्थांचा सवाल; संपूर्ण गावावर शोककळा

ठळक मुद्देतळीये गावात ८५ ग्रामस्थ गावात होते. सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्यास सुरुवात होताच ग्रामस्थ एका घराच्या अंगणात येऊन थांबले होते. गावावर कोसळलेल्या संकटाची कल्पना येताच आपल्या घरच्यांच्या काळजीने जो-तो गावाकडे जाण्यास सुरू झाले. माणगावपर्यंत पुराच्या पाण्याने रस्ते अडकल्याने पुढे जाता येईना. पाणी ओसरण्याची वाट पाहत शेवटी घराकडे धाव घेतली.

निखिल म्हात्रेअलिबाग : एका क्षणात आई गेली, बाप गेला, गेली वाट अवखळ ती शोधू कुठे, बाप माझा रडत गेला त्याची असवे शोधू कुठे, अशी आर्त हाक घालत तळीये गावातील माहेरवाशीण रडत बसली आहे. संपूर्ण कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही आता यायचे कुठे, आमच्या भावना व्यक्त करायच्या कुठे, असे एक ना अनेक प्रश्न येथील लेकीबाळींना पडले आहेत. गुरुवारी सायंकाळी कोसळलेल्या दरडीखाली गायब झालेल्या ग्रामस्थांच्या लेकीबाळी, मुले दुर्घटना समजल्यानंतर आकाशालाही पाझर फुटेल, अशा स्वरात हंबरडा फोडत रडत असल्याचे पाहून मन सुन्न झाले.

तळीये गावात ८५ ग्रामस्थ गावात होते. सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्यास सुरुवात होताच ग्रामस्थ एका घराच्या अंगणात येऊन थांबले होते. आपला संसार डोंगर गिळणार या कल्पनेने गावातून पायदेखील निघत नव्हता. पण पाठीमागे मृत्यू दिसत असल्याने पळायच्या तयारीत असणाऱ्या अबालवृद्ध, महिला व पुरुष यांना डोंगराने आपल्या मगरमिठीत ओढले. क्षणार्धात नांदत असलेला तळीये गाव डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गायब झाला. त्यामुळे मागे राहिलेल्या मुलांना आज आपले आई-वडील, नातेवाईक आपल्यामध्ये नसल्याचे दु:ख मोठ्या प्रमाणात झाले आहे.

किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झालानोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर असलेल्या चाकरमान्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावावर कोसळलेल्या संकटाची कल्पना येताच आपल्या घरच्यांच्या काळजीने जो-तो गावाकडे जाण्यास सुरू झाले. पण माणगावपर्यंत पुराच्या पाण्याने रस्ते अडकल्याने पुढे जाता येईना. पाणी ओसरण्याची वाट पाहत शेवटी घराकडे धाव घेतली. अनेक संकटांवर मात करीत कसाबसा रस्ता तुडवीत पोहोचलेल्या डोळ्यांना आपले गाव, वाडी, घरे शोधूनही सापडली नाहीत. पळत सुटलेल्या २२ जणांना सोबत घेऊन गेलेला डोंगर बौद्ध वाडीमध्ये थेट मृतदेहच हाती आले. एवढे मोठे ३२ घरांचे गावच्या गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली नाहीसे झाले. त्यामुळे मोठी जीवित व आर्थिक हानी झाली आहे. मात्र सोडून गेलेल्या नातेवाइकांना आता भेटायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगडfloodपूर