शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: डोंबिवलीतील कुवेत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतूवरून मारली उडी, शोध सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 20:34 IST

Atal Setu News: वैफल्यग्रस्त झालेल्या डोंबिवलीतील कुवैत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची अटलसेतुवरुन उडी मारुन बेपत्ता झाला असल्याची दूदैवी घटना मंगळवारी (२४) दुपारच्या सुमारास घडली.

- मधुकर ठाकूर उरण - वैफल्यग्रस्त झालेल्या डोंबिवलीतील कुवैत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची अटलसेतुवरुन उडी मारुन बेपत्ता झाला असल्याची दूदैवी घटना मंगळवारी (२४) दुपारच्या सुमारास घडली.श्रीनिवास कुरुकुट्टी (३८) असे या बेपत्ता इसमाचे नाव असून त्याचा समुद्रात सर्वत्र शोध सुरू असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.

डोंबिवलीतील श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत काम करीत होते.इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून काम करीत असलेल्या श्रीनिवास यांनी ऑक्टोबर २०२३ मध्येच कुवैत येथील जॉब सोडून डोंबिवलीतच आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता.मात्र व्यवसायात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे श्रीनिवास वैफल्यग्रस्त झाले होते. मंगळवारी (२४) दुपारी १२.३० वाजता नेक्सास या चारचाकी गाडीतून  श्रीनिवास अटलसेतुवर आले होते.सेतुवर येताच चारचाकी पार्क करून इकडे तिकडे न पाहता थेट सेतूवरुन थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेऊन बेपत्ता झाले.याआधीही कुवैतमध्ये काम करीत असतानाही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.अशी माहिती नातेवाईकांनी दिली असल्याचे न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी सांगितले.

अटलसेतुवरुन समुद्रात उडी घेऊन बेपत्ता झालेल्या श्रीनिवास यांचा चार मच्छिमार बोटी, सागरी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने शोध सुरू आहे.मात्र खवळलेला समुद्र आणि खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.त्यामुळे शोधमोहीमेला अद्यापही यश मिळाले नसल्याची माहिती वपोनि बागवान यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगडdombivaliडोंबिवली