शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून येणाऱ्या कंपन्यांचे रायगड बनतेय आगार - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 02:05 IST

सध्याच्या घडीला रायगड बाहेरच्या कंपन्यांचे आगार बनत चालले आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पनवेल - रत्नागिरी येथून नाकारलेले नाणार आता रायगडमध्ये येऊ घातले आहे. एकेकाळी रायगड हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते. मात्र, ही ओळख आता पुसू लागली आहे. सध्याच्या घडीला रायगड बाहेरच्या कंपन्यांचे आगार बनत चालले आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.शुक्रवारी खारघर येथे आयोजित रयत सेंटेनरी सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड इनक्युबेशन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी शरद पवार बोलत होते. काळानुरूप बदलाची नोंद करून रयत शिक्षण संस्था पुढे वाटचाल करीत आहे. ‘कमवा आणि शिका’ या ब्रीदवाक्याप्रमाणे नवीन पिढीला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रयत प्रोत्साहन देत आहे. या शिक्षण संस्थेमार्फत नवीन उद्योजक व व्यावसायिक घडविण्याचे काम सुरू असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्था ही नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे प्रयत्न करीत असते. रयतच्या या उपक्रमाला टाटा कन्सल्टन्सीने मोलाची साथ दिली. टाटा कन्सल्टन्सीने या ठिकाणी सुमारे ४० कोटींची मदत केली आहे. रशिया, कोरिया सारख्या कंपन्या आज भारतात येत आहेत. या केंद्रात शिक्षण घेतलेले विद्यार्थी उद्योजक स्वत:च्या पायावर उभे राहणार आहेत. तसेच स्थानिकांनादेखील याचा मोठा फायदा होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी पार्क चे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनीही या वेळी या केंद्राचा वापर कशाप्रकारे होणार आहे, याची माहिती देत लघु सूक्ष्म उद्योगधंद्यामध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांना त्यांच्या प्रोडक्ट्वर संशोधन करण्याची संधी या केंद्रात मिळणार आहे, हे केंद्र उभारणीसाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मोठी आर्थिक मदत केली आहे. दरवर्षी या केंद्रांतून विशेष गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रामशेठ ठाकूर हे स्कॉलरशिप देणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील यांनी, सध्याच्या घडीला साडेचार लाख विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले.या वेळी शरद पवार यांनी केंद्राची माहिती घेतली. रयत सेंटेनरी सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड इनक्युबेशन केंद्राची पाहणी केली. या वेळी एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्री चौगुले, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील आदीसह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडSharad Pawarशरद पवार